Download App

अमृता खानविलकर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘या’ कार्यक्रमात ‘जज’ च्या भूमिकेत दिसणार

Amruta Khanvilkar : नेहमी सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत राहणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) पुन्हा एकदा

  • Written By: Last Updated:

Amruta Khanvilkar : नेहमी सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत राहणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होय, यावेळी ती ‘जज’ च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

तुम्हाला हे माहिती असेलच की, काही दिवसापूर्वी अमृताच अपहरण झाल्याचा व्हिडिओ झी मराठीवर (Zee Marathi) रिलीज करण्यात आला होता. आता या व्हिडिओच मागचं कारण देखील समोर आले आहे. छोट्या पडद्यावर यापूर्वी देखील लोकप्रिय अभिनेत्री अमृताने अनेक रियालिटी शो मध्ये जज ची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर जज ची भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे.

माहितीनुसार, अमृता खानविलकर ड्रामा ज्युनियर्स (Drama Juniors) कार्यक्रमामध्ये जज च्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमात अमृतासह संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) देखील दिसणार आहे. या वर्षांची सुरुवात अमृता खानविलकरने ” लुटेरे ” सारख्या दमदार प्रोजेक्टने केली होती त्यानंतर ती ” चाचा विधायक है हमारे 3 ” मध्ये दिसली होती. तर काही दिवसापूर्वी तिने 36 डे ची घोषणा केली आहे. तर आता अमृता ड्रामा ज्युनिअर्स कार्यक्रमात जज ची भूमिका बजावणार आहे.

ड्रामा ज्युनिअर्स कार्यक्रमाबद्दल बोलताना अमृता खानविलकर म्हणाली, या कार्यक्रमासाठी मी खूप उत्सुक असून एवढ्या लहान कलाकारांना जज करणं माझ्यासाठी आव्हानं आहे. यापूर्वी मी अनेक कार्यक्रमामध्ये जज ची भूमिका साकारली आहे मात्र हा कार्यक्रम खास आहे. या कार्यक्रमामध्ये लहान मुलासोबत दंगा करायला मज्जा येणार आहे असं ती म्हणाली.

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, कार-बसची घडक; 2 जणांचा मुत्यू

तर तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ” कलावती , ललिता बाबर , पठ्ठे बापूराव , 36 डे ” सारख्या प्रोजेक्ट्समध्ये ती दिसणार आहे.

27 ओबीसी, 15 एसटी अन्… कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण समीकरण

follow us

वेब स्टोरीज