अहमदनगरमध्ये भीषण अपघात, कार-बसची घडक; 2 जणांचा मुत्यू

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, कार-बसची घडक; 2 जणांचा मुत्यू

Ahmednagar Accident : रविवारी रात्री अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) बटेवाडी शिवारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात (ST Bus And Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा मुत्यू झाला असून तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, कारमध्ये असणाऱ्या विजय गंगाधर गव्हाणे (24) आणि पंकज सुरेश तांबे (वय 24) यांचा या अपघातात मुत्यू झाला आहे तर मयूर संतोष कोळी (वय 18) हा गंभीर जखमी झाला आहे. माहितीनुसार, तिघेजण खर्डा येथून कारने जामखेडच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, एसटी बस जामखेड येथून खर्डाच्या दिशेने येत होती. बटेवाडी शिवारात कोल्हे पेट्रोल पंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला असून अपघाताची माहिती मिळतातच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी धाव घेत बचावकार्य सुरु केला तसेच उपचारासाठी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

27 ओबीसी, 15 एसटी अन्… कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण समीकरण

खाजगी रुग्णालयात प्राथामिक उपचार घेतल्यानंतर तरुणांना अहमदनगरमधील सिव्हिल रुग्णालयात (Ahmednagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र तिथे उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयलसह ‘या’ खासदारांनी घेतली शपथ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज