खळबळजनक! पोलिसांच्या हातावर तुरी, बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडेने रुग्णालयातून ठोकली धूम; अहिल्यानगरमधील घटना

खळबळजनक! पोलिसांच्या हातावर तुरी, बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडेने रुग्णालयातून ठोकली धूम; अहिल्यानगरमधील घटना

Accused Sunil Lokhande Absconded From Civil Hospital : अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी (Ahilyanagar News) समोर आली आहे. गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली. ही घटना मंगळवारी (ता.10) रोजी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना (Crime News) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?

राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात 7 ऑक्टोबर 2021 रोजी दहशत करून गोळीबार केला होता. या प्रकरणी आरोपी सुनील लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी (Sunil Lokhande Absconded From Civil Hospital) सुनावली होती. मात्र, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आकुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा? सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना सादले होते. आज लोखंडे पोलिसांना चकवा देत फरार झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

प्रकरण नेमकं काय?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार केल्याचा गुन्हा आरोपीवर आहे. आरोपी सुनील लोखंडेने पोलीस उपअधीक्षक संदीप मेटके यांच्यावर गोळीबार केला होता. घटनेनंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी तो कारागृहात शिक्षा भोगत होता. परंतु सहा दिवसांपूर्वी लोखंडेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याने संधीर साधत बंदोबस्तावर असलेल्या गार्डची नजर चुकवली अन् रूग्णालयातून धूम ठोकली. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?

या घटनेमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील या घटनेने धाबे दणाणले आहेत. नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी जामखेड आणि तपोवन परिसरात गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube