Tuljapur accident : भाविकांवर काळाचा घाला! ट्रक आणि कारची जबर धडक, 4 ठार, सहा जखमी

Tuljapur accident :  भाविकांवर काळाचा घाला! ट्रक आणि कारची जबर धडक, 4 ठार, सहा जखमी

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) मोहोळजवळ मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत चार जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या समारास घडली आहे. कारमधील सर्व जण देवदर्शनासाठी तुळजापूरला (Tuljapur accident) जात असताना हा भीषण अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत व जखमी हे अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील रहिवाशी होते. या महिला भाविक कारने (एमएच ४६ – एपी ४१२०) ने तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात होत्या. मात्र, पुणे-सोलापूर महामार्गावर यावली गावाजवळ सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकला भाविकांची कार धडकली. या अपघातात कारचालकासह दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातातील एका जखमी महिलेचा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मोहोळ पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

भाऊसाहेब वाकचौरेंच्या हाती पुन्हा शिवबंधन; ठाकरेंचा शिर्डीचा उमेदवार ठरला? 

आदमअली मुनव्वर अली शेख (वय 37), हिराबाई रामदास पवार (वय 75), कमलाबाई मारुती वेताळ (वय 60, रांजणगाव मशीद, पारनेर) हे गंभीर जखमी झाले होते. जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय 40, राजनगाव मशीद) या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बळी बाबू पवार (वय 27), चाकुली भीमा पवार (वय 27), साई योगीराज पवार (वय 7), मंदाबाई नाथा पवार (वय 52), सुरेखा भरत मोरे (वय 45), बायजाबाई रामदास पवार (वय 60, रा. रांजनगाव, जि. अहमनगर) अशी जखमींची नावे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube