Download App

Amruta Khanwilkar: पावसाची कविता आणि संकर्षणची आठवण? अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडीओ

Amruta Khanvilkar: अमृताने नुकताच एक गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका खास कवितेसाठी संकर्षणची आठवण काढताना दिसत आहे.

Amruta Khanvilkar Video Post: अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)ने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या फॅशन स्टेटमेंटने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) झी मराठीवर ड्रामा ज्युनियर या शोच जजिंग करत आहे आणि तिचा सहसोबती संकर्षण (Sankarshan Karhade) नाटकाच्या दौरयावर आहे म्हणून सेटवर अमृता आणि श्रेया संकर्षणला किती मिस करतात, याची एक झलक अमृताने तिच्या रिल मधून दाखवली आहे.


संकर्षण हा उत्तम कविता करतो आणि आता अमृता तिच्या या कवी मनाच्या मित्राला खूप मिस करत असल्याचे या रिल मधून बघायला मिळत आहे. अमृता याबद्दल बोलताना सांगते की, सेटवर एखादा व्यक्ती कमी असला तरी त्याला आम्ही सगळेच मिस करतो मग ते अगदी सेटवरच्या क्रू पासून मी श्रेया आणि आमची लहानगी मंडळी सगळेच एकमेकांना मिस करतात. सध्या आमचा कवी मनाचा जिवलग मित्र संकर्षण त्याचा नाटकांच्या निमित्ताने परदेशवारी करतोय आणि आता आम्ही त्याला खूप मिस करतोय म्हणून त्याचासाठी ही खास रिल आम्ही केली आहे. संकर्षण आता हा व्हिडिओ बघून तरी लवकर ये रे.

अमृता कायम तिच्या सोशल मीडियावरून सेटवरच्या अनेक धम्माल गोष्टी शेयर करत असते आणि हा व्हिडिओ देखील तितकाच खास आहे. अमृता या शो च्या निमित्ताने सेटवर अनेक तिच्या लहानग्या मुला सोबत जोडली गेली आहे. अमृताने 2024 वर्षाची दमदार केली आहे आणि येणाऱ्या काळात देखील ती अजून उत्तोमतोम चित्रपटात दिसणार आहे. हिंदी आणि मराठीत अमृता आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून देत असून आता येणाऱ्या काळात ती काय नवीन घेऊन येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

फ्लॅशबॅक लंडन ट्रीप; Amruta Khanvilkar च्या लंडन ट्रीपचे अनसीन फोटो

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर 22 जूनपासून शनिवार-रविवार रात्री 9 वाजता प्रसारित होत आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सांभाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

follow us