An entertaining story of a happy-go-lucky family Teaser launched for Kapuskonda a film featuring a family dog : मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित मनोरंजक ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. सत्यघटनेवरून प्रेरित असलेली अत्यंत वेगळी गोष्ट, उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
मराठवाड्यात दुष्काळाचा दुहेरी फटका; वाचा, कुठं किती दिवसांचा चारा अन् कुठं किती दिवसांचा पाणीसाठा?
पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करीत असून जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. नी “कापूसकोंडा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे.“कापूसकोंडा” चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांच आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सुरबद्ध केली आहेत, तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील या चित्रपटाला लाभले आहे.
चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे. “कापूसकोंडा” या चित्रपटातून सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र आले आहेत.
“कापूसकोंडा” या चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे
राजा, राणी आणि राजकुमारी असलेल्या हॅपी गो लकी फॅमिलीची ही रंजक गोष्ट आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट म्हणून मिळालेला कुत्रा यांच्या नात्यावर आधारित ही गोष्ट आहे. ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन या ट्रेलरला देण्यात आली आहे. तसंच सत्यघटनेवरूम हा कथा प्रेरित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एका कुत्र्यामुळे काय काय घडामोडी घडतात, त्यातून मानवी भावभावना, नातेसंबंध कशा पद्धतीनं उलगडत जातात हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. टीजरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली आहे. उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे नात्यांचा “कापूसकोंडा” मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंतची वाट पहावी लागणार आहे.
