Download App

महाराष्ट्राचा आनंद सोहळा आषाढीत अनिकेत शोधतोय विठुरायाला; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

Aniket Vishwasrao पंढरीच्या वारीत विठूरायाचा शोध घेतोय त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट पहावा लागेल.

Aniket Vishwasrao Film on Pandharpur Aashdhi Ekadashi : पंढरीच्या वारीत (Pandharpur Aashdhi Ekadashi) वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतात. त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा. अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao ) हा मात्र या विठूरायाचा शोध घेतोय. हा शोध तो कशासाठी घेतोय? हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल. हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.

Chhagan Bhujbal यांची भूमिका ठरली; मोदींकडे मोठी मागणी करत, हाकेंसोबत मैदानात उतरणार

या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून, ‘चला आपण आणू आपल्या विठुरायाला’… असं अनिकेत बोलताना दिसतोय. विठ्ठलाच्या शोधात असतांना अनिकेतच्या हाती काय येतं? आणि हा शोध नेमका कुठे संपतो ? याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीझर वरून निर्माण झाली आहे. अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार,किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव या कलाकारांची झलक सुद्धा या टीझर मध्ये पहायला मिळतेय.

महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनिकेत सांगतो, या चित्रपटात मी जना ही व्यक्तिरेखा साकारतोय. भक्तीत लीन होणारा, श्रद्धाळू, बापासाठीअगदी श्रावणबाळ असलेला जना परंपरागत विठ्ठल मंदिर वाचवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे. १९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर,अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.

follow us

वेब स्टोरीज