Download App

ॲनिमलच्या यशानंतर अनिल कपूर ओटीटीवर पहिल्या स्थानावर, ‘फाइटर’चा नेटफ्लिक्सवर होतोय ट्रेंड

Anil Kapoor : दोन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर (box office) सोनेरी कमाई केल्यानंतर अनिल कपूर सध्या जोरदार काम करताना दिसतात आणि अशातच त्याचा नवीन चित्रपट ओटीटी (OTT) रिलीज होऊन ‘फाइटर’ (Fighter Movie) नेफ्लिक्सवर (Neflix) नंबर 1वर ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे अनिल कपूरचा OTT वर येणारा हा दुसरा चित्रपट असून दोन्ही चित्रपट ट्रेंड मध्ये आहेत.

‘फायटर’पूर्वी, त्याचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक काळ ट्रेंड करत होता. इंस्टाग्रामवर त्यांनी या बद्दल खास गोष्ट शेयर केली आहे. या मेगास्टारने सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनात ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगची भूमिका केली होती. ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन देखील मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी अभिनेत्याला प्रचंड प्रशंसा आणि कौतुक मिळाले, ज्याने मनोरंजन उद्योगात एक पॉवरहाऊस कलाकार म्हणून त्याची प्रतिष्ठा मजबूत केली.

नेटफ्लिक्सवर ‘फायटर’ची लोकप्रियता वाढत असताना, अभिनेता सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ नावाच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदूकोण व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका व हृतिक ही जोडी प्रथमच पडद्यावर पाहायला मिळाली आहे.

Moses Singh; … म्हणून यो यो हनी सिंग माझ्यासाठी फेमस’, दिग्दर्शकांनी थेटच सांगितलं

एका मुलाखती दरम्यान हृतिकने अनिल कपूर यांच्या कामाची प्रशंसा केली, इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हृतिकने त्याचे वडील राकेश रोशन यांच्या बऱ्याच चित्रपटात सहाय्यक म्हणून काम केलं आहे. त्यापैकी ‘खेल’ आणि ‘कारोबार’ या चित्रपटात अनिल कपूर होते अन् त्यावेळी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हृतिकला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्याचीच आठवण हृतिकने काढली. तो म्हणाला, “मी अनिल सरांना सेटवर पाहतच मोठा झालो आहे. फायटरच्या वेळी चित्रीकरण करताना पुन्हा तोच जुना काळ डोळ्यासमोर उभा राहीला.

follow us

वेब स्टोरीज