OTT Platform: तेजा सज्जाचा ‘हनुमान’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?; वाचा सविस्तर…

OTT Platform: तेजा सज्जाचा ‘हनुमान’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?; वाचा सविस्तर…

HanuMan OTT Release: तेजा सज्जाचा (Teja Sajja) हनुमान हा 2024 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट चाहत्यांना खूपच आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) उत्तम कलेक्शन केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. (OTT Platform ) हा चित्रपट एक नाही तर 2-3 प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. आता या चित्रपटाचे हक्क इतर भाषांमध्ये विकले गेले आहेत. सोशल मीडियावरही ( Social Media) याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

हनुमानची हिंदी आवृत्ती आता जिओ सिनेमावर (Jio Cinema) रिलीज झाली आहे. जियो सिनेमावर लाखो लोकांनी हा हिंदी चित्रपट पाहिला आहे. चित्रपटाची तेलुगू आवृत्ती ही ZEE5 वर प्रदर्शित झाली. हा चित्रपट या भाषांमध्ये इतका आवडला की इतर भाषांमध्येही तो प्रदर्शित करण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर आता हा चित्रपट तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज

आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीजसाठी सज्ज आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हनुमान पाहण्यासाठी सज्ज व्हा. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

शरद पोंक्षे यांचा मुलगा पहिल्यांदाच वडिलांसोबत सिनेमात झळकणार; लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट

बॉक्स ऑफिसवर धमाका केला

हनुमानचे बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन होते. या चित्रपटाने हिंदी भाषेतच 52.08 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 200.32 कोटी रुपये होते. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. हनुमानचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी प्रशांत वर्मा यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव जय हनुमान असणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये याबद्दलची उत्सुकता खूपच वाढली आहे. आता सर्वांनाच चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube