‘सूबेदार’ अनिल कपूरचा दमदार अॅक्शन-ड्रामा! ‘या दिवशी होणार एक्सक्लुझिव्ह प्रीमियर

Anil Kapoor यांच्या अक्शन-ड्रामा चित्रपट सूबेदारच्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली. हा चित्रपट 5 मार्च रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे.

Anil Kapoor

Anil Kapoor

Anil Kapoor’s powerful action-drama ‘Subedar’! Exclusive premiere to be held on 5 March : भारतामधील प्रेक्षकांचे सर्वाधिक पसंतीचे मनोरंजन प्लॅटफॉर्म असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल अॅक्शन-ड्रामा चित्रपट सूबेदारच्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली. हा चित्रपट 5 मार्च रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा जाहीर; 6 मार्च ठरणार महत्वाचा दिवस

तुम्हारी सुलु’, ‘जलसा’ आणि ‘दलदल’ सारख्या उत्कृष्ट कथांमुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी सूबेदारचे दिग्दर्शन केले असून विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे. ओपनिंग इमेज फिल्म्स निर्मित आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क (AKFCN) यांच्या सहकार्याने साकारलेला हा चित्रपट दमदार आणि भावनांनी परिपूर्ण अॅक्शन-ड्रामा आहे.

राष्ट्रगीतापूर्वी वाजवले जाणार वंदे मातरम्; 3 मिनिटे 10 सेकंद उभे राहणे बंधनकारक; मोठे आदेश निघाले

या चित्रपटाची कथा सुरेश त्रिवेणी आणि प्रज्वल चंद्रशेखर यांनी लिहिली आहे. यात अनिल कपूर आणि राधिका मदान मुख्य भूमिकेत झळकणार असून सौरभ शुक्ला, आदित्य रावल, फैजल मलिक आणि मोना सिंह यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. *‘सूबेदार’*चा प्रीमियर 5 मार्च रोजी भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये होणार आहे.

पक्षविरोधी भूमिका महागात! भाजपकडून तब्बल 69 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

*‘सूबेदार’*मध्ये निवृत्त सैनिक सूबेदार अर्जुन मौर्य यांच्या आयुष्यातील चढ-उतारांनी भरलेला प्रवास दाखवण्यात आला आहे. बदलत्या जगात शांतता आणि सन्मान शोधताना त्याच्या आयुष्यभर जपलेल्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. अनिल कपूर यांनी या भूमिकेत प्रभावी अभिनय साकारला असून ते गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसतात. त्याचबरोबर तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आणि नेहमी योग्य गोष्टीची साथ देण्याचा त्यांचा निर्धार चित्रपटात ठळकपणे मांडला आहे. भारताच्या मध्यवर्ती पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा समाजातील अधोगतीच्या काळात सन्मान आणि मूल्यांची लढाई प्रभावीपणे उभी करते.

बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअ‍ॅपवरून धमकी; मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा

प्राइम व्हिडिओ इंडिया येथील डायरेक्टर आणि ओरिजिनल्सचे प्रमुख निखिल मधोक म्हणाले, “सूबेदार ही केवळ दमदार अॅक्शन फिल्म नाही, तर वडील-मुलीच्या नात्यावर आधारित हृदयस्पर्शी कथा आहे. या चित्रपटात अनिल कपूर यांचा अभिनय अप्रतिम आहे आणि ते अॅक्शन हिरो म्हणून सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकतील. सुरेश त्रिवेणी, अनिल कपूर, विक्रम मल्होत्रा आणि संपूर्ण टीमसोबत काम करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 5 मार्चची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, जेव्हा भारत आणि जगभरातील प्रेक्षक प्राइम व्हिडिओवर या चित्रपटाचा आनंद घेतील.”

टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल

ओपनिंग इमेज फिल्म्सचे भागीदार आणि *‘सूबेदार’*चे निर्माता विक्रम मल्होत्रा म्हणाले, “सूबेदार खऱ्या अर्थाने एक दमदार चित्रपट आहे. देशसेवा, शिस्त आणि त्याग यांचे प्रतीक असलेले असे मुख्य पात्र प्रेक्षकांनी कदाचित यापूर्वी पाहिले नसेल. सुरुवातीपासूनच ही कथा मला भावली, कारण ती थरारक असण्यासोबतच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी आहे. नातेसंबंधांचे सूक्ष्म चित्रण आणि उच्च दर्जाची सिनेमॅटिक मांडणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.

मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र… भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

प्राइम व्हिडिओ, AKFCN आणि सुरेश त्रिवेणी यांच्या सहकार्याने एक उत्कृष्ट सर्जनशील टीम तयार झाली आहे. सुपरस्टार अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिकेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना प्राइम व्हिडिओवर एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देईल. 5 मार्च रोजी भारत आणि जगभरातील प्रेक्षक *‘सूबेदार’*चा आनंद घेतील, याचा आम्हाला आनंद आहे.”

Exit mobile version