Download App

Animal नंतर अनिल कपूर पुन्हा सज्ज! कॅप्टन राकेश जयसिंग म्हणून ‘या’ चित्रपटात झळकणार

Animal : रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमलमध्ये (Animal ) वडिलांच्या भूमिकेत झळकल्यानंतर अभिनेते अनिल कपूर आता पुन्हा सज्ज झाला आहे. यावेळी अनिल कपूर थेट कॅप्टन राकेश जयसिंग या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ज्यामध्ये अनिल कपूर सैन्याच्या गणवेशामध्ये दिसत आहे. अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

कॅप्टन राकेश जयसिंग म्हणून ‘या’ चित्रपटात झळकणार…

या चित्रपटाचं नावं ‘फायटर’ असं आहे. त्याचा फर्स्ट लूक शेअर करताना अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंग, कॉल – रॉकी, पद – कमांडिंग अधिकारी, यनिट -एअर ड्रॅगन्स, फायटर फॉरएव्हर इन अस लिहित त्यांनी या पोस्टमध्ये फायटरचे हॅशटॅग देखील दिले आहेत. त्याचबरोबर हा चित्रपट 25 जानेवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार. त्याची देखील माहिती या पोस्टमध्ये मिळत आहे.

‘INDIA’ आघाडीत मिठाचा खडा! आधी जागा वाटप, नंतरच बैठक; अखिलेश यादव आक्रमक

अनिल कपूर सध्या जोरदार चर्चेत असून जुग जुग जीयो, द नाईट मॅनेजर आणि आता अ‍ॅनिमलच्या सध्याच्या मोठ्या यशासह हा ‘अनिमल का बाप’ त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. फायटरमधील रॉकीच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तो तयार होत आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून आणि त्याचे प्रोडक्शन हाऊस, मार्फ्लिक्स पिक्चर्स निर्मित आहे. अनिल कपूर व्यतिरिक्त यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत हा चित्रपट 2024 च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे.

NARI मध्ये नोकरीची संधी, महिन्याला 64 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

दरम्यान सध्या अनिल कपूरचा अ‍ॅनिमल चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ‘अ‍ॅनिमल’ रिलीज होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सातत्याने नवीन रेकॉर्ड बनवत आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. अ‍ॅनिमलने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला कमावला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटातील रणबीर कपूरचा रक्तबंबाळ आणि अॅक्शन अवतार चाहत्यांना आवडला आहे. चार दिवसांत या चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज