Animal Movie Marathi Seen : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal Movie) नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींचा गल्लाा जमवला. चित्रपटातील गाणी,एक से बढकर एक सीन, रणबीरचा दमदार अभिनय त्याला रश्मिकाची साथ. तर दुसरीकडे बॉबी देओलचा खलनायकी चेहरा सगळंच दमदार होतं. पण, थांबा यात एक आणखी गोष्ट आहे जी ऐकल्यावर मराठी माणसाचं मन नक्कीच सुखावलं. या चित्रपटातील काही मराठी चेहऱ्यांची आणि त्यांनी साकारलेल्या अभिनयाची जोरदार (Animal Movie Marathi Seen) चर्चा होत आहे. फक्त सिनेमाच नाही तर चित्रपटाच्या संगीतातही अजय-अतुल या मराठमोळ्या जोडीचं योगदान आहे. चित्रपटातील या मराठी गोष्टी प्रेक्षकांनीच शोधून काढल्या असून ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
Animal: असा शूट झाला ‘बॉबी देओल’’चा एण्ट्रीचा सीन? डोक्यावर ग्लास ठेवण्याची कल्पना कोणाची?
अॅनिमल सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या जोडीलाच उपेंद्र लिमये, मृण्मयी गोडबोले यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. उपेंद्र लिमये याने या चित्रपटात एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. उपेंद्र लिमये (Animal Movie Marathi) हा एक दर्जेदार अभिनेता आहे. त्याने त्याच्या या लौकिकाला साजेशीच भूनिका या हिंदी चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटातील त्याचा ‘चांगभलं’हा डायलॉग आता प्रेक्षकांच्या तोंडीही चांगलाच रुळला आहे. या चित्रपटात उपेंद्रचे (Upendra Limaye) अनेक संवाद चक्क मराठीत ऐकायला येतात. प्रेक्षकही याला चांगलीच दाद देत आहेत.
हिंदी सिनेमात अजय-अतुलचं मराठी गाणं
मृण्मयी गोडबोल हीने या चित्रपटात एक छोटेसे पात्र साकारले आहे. तिची भूमिका छोटी असली तरी चर्चा मात्र मोठी होत आहे. या चित्रपटाने मृण्मयीने मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका साकारली आहे. याबरोबरच चित्रपटात अजय-अतुल यांच्या संगीताची झलक पाहण्यास मिळते. अजय अतुल यांचं ‘डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला’ हे गाणंही (Animal Movie Marathi Song) ऐकायला मिळालं आहे. हिंदी चित्रपटात मराठी गाणं अन् तेही अजय-अतुलचं मग टाळ्या अन् शिट्ट्या ठरलेल्याच. या गाण्यावेळी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजतातच. असे काही खास अन् तितकेच मनाला भुरळ पाडणारे मराठी सीन या चित्रपटात आहेत. त्याचाही वाटा चित्रपटाच्या यशात नक्कीच आहे. हिंदी चित्रपटात मराठीची ही आणखी नवी एन्ट्री मराठी सिनेरसिकांना नक्कीच सुखावणारी आहे.