Animal New Poster : अॅनिमल चित्रपटाचं नवं पोस्टर (Animal New Poster) रिलीज करण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला होता. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पीएम नरेंद्र मोदींना फोन, दोघांत काय चर्चा झाली?
अॅनिमल चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज…
टीझर नंतर आता अॅनिमल चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. या नव्या पोस्टरमध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) एकमेकांना किस करताना दिसत आहेत. त्यामुळे हे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे.
‘अॅनिमल’च्या टीझरमध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल हटके अंदाजात पाहायला मिळाले. या टीझरमध्ये धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये सुरुवातीलाच रणबीर आणि रश्मिका दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी रश्मिका ही रणबीरच्या वडिलांचा विषय छेडते, त्याबद्दल बोललल्यानंतर रणबीरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. ते बोललेलं रणबीरला काही आवडत नाही.
‘लेक लाडकी’त मिळणार एक लाख, कधीपासून लागू होणार योजना?
अॅनिमल चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्येच रिलीज होणार होता. त्यानंतर ही रिलीजची तारीख बदलून आता तो 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी असल्याचे संदीप रेड्डी यांनी सांगितले आहे. ‘अॅनिमल’ हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
https://youtu.be/PCA55ahwZh8?si=qfdaIyjis5dKCyjU