Download App

सलोनी बत्रा साकारणार रणबीरच्या बहिणीची भूमिका; ‘या’ सिनेमाच्या पडद्यामागील फोटो Viral

Animal Saloni Batra: अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर सलोनी बत्रा (Saloni Batra) तिच्या आकर्षक अभिनयाने मनोरंजनसृष्टीत चर्चेत आली आहे. ‘सोनी’ (2018), “तैश” (2020), आणि “200: हल्ला हो” (2021) मधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आता आगामी “अ‍ॅनिमल” (2023) (Animal Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित आणि रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अभिनय करत असलेल्या बत्राचा इंडस्ट्रीतील प्रवास हा आता नव्या उंचीवर पोहचणार आहे.

 

आगामी चित्रपटात सलोनी बत्रा रीतची भूमिका साकारत आहे, जी रणबीर कपूरच्या बहिणीची मुख्य भूमिका साकारणार आहे. दोन कलाकारांमधील हे खास नात पडद्यामागील चित्रांमध्ये दिसून आले आहे. यामुळे चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. हे फोटो ऑन-स्क्रीन कनेक्शनच दाखवत नाहीत तर दोन्ही अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिकेसाठी केलेले उल्लेखनीय प्रवास देखील बघायला मिळत आहे.

या सिनेमात अनिल कपूरनेही एनिमलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरीज, मुराद खेतानीचा सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे.

साकिब सलीमचा फिटनेस रुटीन! त्याच्याकडून प्रत्येक तरुण घेऊ शकतो प्रेरणा

‘अ‍ॅनिमल’मध्ये अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती दिमरी यांच्या प्रमुख भूमिकांसह स्टार-स्टडेड कलाकार आहेत. ट्रेलरने आधीच धुमाकूळ घातला असून आता या पडद्यामागील बीटीएसने उत्साह वाढवला आहे. ‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होण्याच्या तयारीत असताना चाहते उत्सुक आहेत. ‘अ‍ॅनिमल’ हा तिच्या आश्वासक कारकिर्दीतील एक अनोखा मैलाचा दगड ठरणार आहे.

Tags

follow us