साकिब सलीमचा फिटनेस रुटीन! त्याच्याकडून प्रत्येक तरुण घेऊ शकतो प्रेरणा

साकिब सलीमचा फिटनेस रुटीन! त्याच्याकडून प्रत्येक तरुण घेऊ शकतो प्रेरणा

Saqib Salim: सुप्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल साकिब सलीम (Saqib Salim) हा नेहमीच त्याच्या अनोख्या फिटनेसच्या फंडामुळे (Fitness) जोरदार चर्चेत असतो. (Social media) कायम तो फिट राहण्यासाठी त्याचा फिटनेस फंडा फॉलो करत असतो.  त्यामुळे त्याचे कौतुक देखील होत आहे. त्याच्या अभिनय कौशल्याच्या पलीकडे साकिब हा फिटनेससाठी कायम ओळखला जात असतो, आणि त्याच्या या फिटनेसची सर्वत्र जोरदार चर्चा बघायला मिळत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saqib Saleem (@saqibsaleem)


तो कायम फिट राहण्यासाठी अनोख्या पद्धती वापरत असतो. तो पारंपारिक वेटलिफ्टिंगपेक्षा पुश-अप्स, पुल-अप्स आणि किकबॉक्सिंग सारख्या शारीरिक व्यायामांना कायम प्राधान्य देत असतो. जिममध्ये तो रोज 3-5 किमी धावतो आणि एरियल योग करत असतो. साकिब सलीमच वर्कआऊट कार्डिओ आणि त्याच्या आहाराचा एक अनोखा फंडा आहे. तो फॉलो करत कायम फिट राहत असतो.

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 मध्ये सलमान खानच जिंकल मन

या डायनॅमिक अभिनेत्याचे काकुडा आणि क्राइम बीटमध्ये काही रोमांचक प्रकल्प आहेत जे ओटीटी रिलीजसाठी तयार आहेत. साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube