Shilpa Shetty: स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी नेमकं कोणते योगासने करते एकदा पाहाच

Shilpa Shetty: स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी नेमकं कोणते योगासने करते एकदा पाहाच

International Yoga Day 2023: वयाच्या ४७व्या वर्षी देखील शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अतिशय फीट असताना दिसून येते. ती नेहमी योग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) शेअर करत असतात. शेल्पी शेट्टी करत असलेली आसने तुम्हाला करायची आहेत का? असतील तर ही बातमी एकदा नक्की वाचा…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)


बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने तर जिंकली आहेच. परन्तु आज वयाच्या ४७ वर्षी देखील ती तरुण अभिनेत्रींना जोरदार टक्कर देत असताना दिसून येते. शिल्पाच्या फिट राहण्या पाठीमागचे नेमकं काय कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला असणार आहे. ती सतत योग करत असताना दिसून येत असते. आज २१ जून रोजी योग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शिल्पा शेट्टीचा फिटनेस फंडा नेमका काय आहे. शिल्पा शेट्टी करत असलेली योगासने तुम्ही देखील घर बसल्या करु शकता. योगासने केल्याने शरीराचा समतोल राखला जात असतो, लवचिकता येते, रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीरामध्ये कुठेही दुखणे किंवा जडपणा असल्यास या समस्येपासून देखील सुटका मिळत असते. तुम्ही जर रोज योगा करायचा असेल आणि कोणते योगासन करावे हे समजत नसेल, तर शिल्पा शेट्टीकडून या टिप्स जरूर घ्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)


नौकासनाला बोट पोज म्हणतात. हे योगासन करणे अतिशय सोपे आहे, आणि यामुळे शरीराला अनेक फायदे होत असतात. नौकासन केल्याने हात आणि पायांचे स्नायू टोन होत असतात, पोट आत असते आणि पचन चांगले होण्यास मदत होते. हा योग करत असताना पाठीवर जमिनीवर झोपावे लागते. यानंतर शरीराचा वरचा भाग, पाय आणि दोन्ही हात वर करायचे असतात, आणि नितंब जमिनीला चिकटलेले राहते. हे योगासन ३० सेकंद धरून ठेवा आणि नंतर सामान्य स्थितीत या.

शिल्पाची योगा प्रॅक्टिस सूर्यनमस्काराशिवाय अपूर्ण आहे. सूर्यनमस्कार करण्याच्या एकूण १२ स्टेप्स आहेत आणि प्रत्येक स्टेप केल्यानेच सूर्यनमस्कार हा पूर्ण होतो. सूर्यनमस्कारातील पहिली आसन म्हणजे सरळ उभे राहून हात जोडणे, त्यानंतर हात आणि शरीराचा वरचा भाग मागे घेतला जात असतो. पुढच्या स्टेपमध्ये शरीराला पुढे वळवून हात पायांच्या जवळ घेऊन जमिनीला स्पर्श करून पुढच्या पोझकडे जावे लागते. या व्हिडीओमध्ये शिल्पाला बघून तुम्ही देखील तिच्याप्रमाणेच सूर्यनमस्कार करू शकणार आहात.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

हे योगासन केल्याने पाठीचा कणा, स्नायू आणि पायांच्या सांध्यांना खूप फायदा होतो. वृक्षासन करण्यासाठी हात जोडून सरळ उभे राहावे लागते. आता एका पायाचा तळ दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवला जाणार आहे. हा पोझ काही वेळ धरून ठेवल्यावर पुन्हा सामान्य स्थितीत या. हा योग आसनामुळे संतुलन, लवचिकता आणि फोकस देखील वाढत असतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube