Download App

Ranbir Kapoor: ‘…तर बायकोने मला मारलं असतं’; रणबीरचं आलियाबद्दलचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Animal: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे आणि चाहते त्याच्या या आगामी सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिल्लीत ‘अ‍ॅनिमल’चा जोरदार प्रमोशन करण्यात आला. प्रमोशनदरम्यान रणबीरने शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं याबाबत खुलासा केला आहे.

रणबीरने सांगितले की, “मी या चित्रपटाचं शूटिंग करत असताना माझी मुलगी राहा हिचा जन्म झाला. मात्र मी अगोदर शूटिंग केले आणि नंतर घरी जाऊन तिला बघितलं. रणबीरने खुलासा केला की अशी हिंस्त्र भूमिका करूनही तो त्याच्या पात्राचा वैयक्तिक आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ देत नव्हता.

तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जसा आहे, तसाच तो कुटुंबाला जाऊन भेटतो. “ती एक अनोखी व्यक्ती आहे. मी माझ्या भूमिका कधी घरी नेत नाही. हेच माझ्या कुटुंबासाठी चांगलं आहे. मी घरी जाऊन असं वागलो असतो, तर माझ्या बायकोने मला खूप मारलं असतं,” असं रणबीर यावेळी म्हणाला.

रणबीर पुढे म्हणाला की, “मी एक वेगळा माणूस आहे. मी माझे पात्र कधी घरी घेऊन जात नाही. हे माझ्या बायकोला पटत नाही. मी घरी जाऊन असे वर्तन केले असते तर माझ्या बायकोने मला मारलं असतं, असे थेट वक्तव्य रणबीर कपूरने भर कार्यक्रमामध्ये आलियाबद्दल केले आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, आलियाने पती रणबीर कपूरच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. इंस्टाग्रामवर ट्रेलर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “खरोखर पूर्ण कॅप्शन टाइप करू शकत नाही.” मी 7000व्या वेळी हा ट्रेलर पाहण्यात खूप व्यस्त आहे.” नीतू कपूरनेही रणबीरचे तोंडभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us