लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajkumar Kohli Passed Away : अभिनेता अरमान कोहलीचे (Armaan Kohli) वडील आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता म्हणून ओळखलं असणारे राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. (Rajkumar Kohli Death) राजकुमार कोहली यांचे शुक्रवारी सकाळी 8 वाजता मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Kohli (@armaankohliofficial)


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास राजकुमार कोहली आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. मात्र बराच वेळ ते बाहेर आले नाहीत. त्यानंतर मुलगा अरमान कोहलीने बाथरूमचा दरवाजा तोडला असता त्यावेळेस ही घटना समोर आली आहे. त्यामुळं त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

राजकुमार कोहलीने ‘या’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले

चित्रपट निर्माते राजकुमार कोहलीने आपल्या करिअरमध्ये ‘नागिन’, ‘जानी दुश्मन’, ‘बीवी नौकर का’, ‘बदले की आग’, ‘राज टिळक’, ‘जीने नहीं दूंगा’, ‘इंटकाम’, ‘बीस साल’ असे अनेक चित्रपट केले आहेत. बाद’ दिग्दर्शन केले होते. ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ हे त्याचे सर्वात हिट चित्रपट ठरला होता. राजकुमार कोहलीने 1962 मध्ये सपना नावाचा चित्रपट बनवला होता, यामध्ये प्रेम चोप्रा मुख्य भूमिकेत होते.

IAS अभिषेक सिंह यांचा पाटेकरांना इशारा, व्हिडिओ जारी करून म्हणाले, ‘युपीत याल तेव्हा…’

‘विधीकार’ चित्रपटातून मुलाला बॉलिवूडमध्ये आणले

राजकुमार कोहली दिग्दर्शित ‘जानी दुश्मन’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. यामध्ये अक्षय कुमार, सनी देओल, सुनील शेट्टी, सोनू निगम, अरमान कोहली यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. हा सिनेमा 2002 मध्ये रिलीज झाला होता. राजकुमार कोहलीने त्यांचा मुलगा अरमान कोहलीला 1992 मध्ये ‘वदिथी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. मात्र, बॉलीवूडमधील त्याची कारकीर्द काही खास नव्हती. अरमान कोहली शेवटचा ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात दिसला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube