Download App

Wedding Anniversary : अंकिता अन् विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरात साजरा होणार लग्नाचा वाढदिवस

Ankita Vicky Wedding Anniversary: बिग बॉसच्या घरात चर्चेत असलेल कपल म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain). 14 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या अखंड प्रेमाने दोघं लग्नबंधनात अडकले आणि कायमचे एकमेकांचे झाले. (Bigg Boss 17) त्यांच्या प्रेमाची केमेस्ट्री ही सगळ्यांना माहीत आहे आणि हे पॉवर कपल बिग बॉस 17 च्या घरात धुमाकूळ घालत आहे. बिग बॉसच्या घरात ही जोडी सुपरहिट ठरत असून यंदाचा लग्नाचा वाढदिवस ते या खास घरात साजरा करणार आहेत.


लोकप्रिय मालिका पवित्र रिश्तामधील अर्चनाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्‍या अंकिता लोखंडेने विकी जैन या व्यावसायिकासोबत लग्न केले आणि हे जोडपे त्यांचा काही मित्रांद्वारे भेटले आणि अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. ते त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतात त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचे अनेक फोटो शेअर देखील केले आहेत. अंकिता आणि विकीची लव्हस्टोरी तितकीच खास आहे. एकमेकांना साथ देत त्यांनी अनेक चढ-उतारांचा सामना केला आणि आजही तितकेच सोबत आहेत.

अंकिता लोखंडेबद्दल जाणून घ्या…

अंकिता कायम सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या सिरियलच्या माध्यमातून अंकिता घराघरात पोहोचली. ‘पवित्र रिश्ता’सह ‘झलक दिखला जा 4′,’ कॉमेडी सर्कस’ आणि ‘एक थी नायिका’ या रुपेरी पडद्यावरील कार्यक्रमांतदेखील अंकिताने काम केलं आहे. आता अंकिताच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Box Office: ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर जादू; 13व्या दिवशी केली एवढी कमाई

विकी जैनबद्दल जाणून घ्या…

विकी जैन हा छत्तीसगड येथील रायपुर येथील राहणारा आहे. तो एक व्यावसायिकी आहे. मात्र कामामुळे तो मुंबईत असतो. मीडिया रिपोर्टनुसार, विकी जैनचं खरं नाव विकास कुमार जैन असे आहे. विकीच्या वडिलांचं नाव विनोद कुमार जैन असून आईचं नाव रंजना जैन असे आहे. विकीचं संपूर्ण शिक्षणंही मुंबईत झालं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकी जैनने व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. ‘महावीर कोल वॉशरीज प्राइवेट लिमिटेड’ या कंपनीचा तो एमडी होता. तसेच महावीर इंस्पायर ग्रुपचा तो आता को-ओनरदेखील आहे.

Tags

follow us