Ankita-Randeep स्टारर स्वातंत्र्य वीर सावरकरचा ट्रेलर प्रदर्शित; दोघांच्या अभिनयाने चाहते प्रभावित

Ankita-Randeep : अंकिता लोखंडे आणि रणदीप हुडा ( Ankita-Randeep ) स्टारर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अंकिता लोखंडे ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही परंतु तिने सोशल मीडियाद्वारे हा ट्रेलर शेअर केला आहे. सारा अली खान स्वातंत्र्यलढ्यात होणार […]

Ankita-Randeep स्टारर स्वातंत्र्य वीर सावरकरचा ट्रेलर प्रदर्शित; दोघांच्या अभिनयाने चाहते प्रभावित

Ankita-Randeep

Ankita-Randeep : अंकिता लोखंडे आणि रणदीप हुडा ( Ankita-Randeep ) स्टारर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अंकिता लोखंडे ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही परंतु तिने सोशल मीडियाद्वारे हा ट्रेलर शेअर केला आहे.

सारा अली खान स्वातंत्र्यलढ्यात होणार सहभागी, ‘ए वतन मेरे वतन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

हा ट्रेलर प्रेक्षकांना राजकारणी आणि कार्यकर्ते विनायक दामोदर सावरकर यांचा प्रवास आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष दाखवणार आहे. ट्रेलरमध्ये रणदीप हुड्डा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लक्ष वेधून घेतो तर अंकिता लोखंडेने त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. प्रेक्षकांना चकित करणारी अंकिताची भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.

…तर आपणाला कधीच माफ करणार नाही, आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र

अंकिता आणि रणदीपच्या पात्रांमध्ये खोली वाढवणारी गोष्ट म्हणजे ते दोघे मूळ व्यक्तिमत्त्वांसारखेच दिसतात ज्यामुळे ते या चित्रपटात काहीतरी नक्कीच वेगळ्या भूमिकेत दिसणार यात शंका नाही. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या व्यक्तिरेखेतील रणदीपचा दृढ विश्वास आणि अंकिताने त्याची पत्नी ‘यमुनाबाई’ची साकारलेली भूमिका उल्लेखनीय ठरणार आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट रणदीप हुड्डा याने दिग्दर्शित केला असून झी स्टुडिओज, आनंद पंडित, रणदीप हुडा, संदीप सिंग आणि योगेश रहार यांचे यात दिसणार आहेत. स्वातंत्र्य वीर सावरकर 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त प्रभाव टाकण्यासाठी सज्ज आहेत.

Exit mobile version