सारा अली खान स्वातंत्र्यलढ्यात होणार सहभागी, ‘ए वतन मेरे वतन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Ae Watan Mere Watan Trailer: सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ चा (Ae Watan Mere Watan Movie) ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात सारा अली खान देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. ‘ए वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan ) 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. उषा मेहता (Usha Mehta) या तरुणीच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची कथा दाखवणारा हा चित्रपट आहे.
‘ए वतन मेरे वतन’ हा सिनेमा उषा मेहताचा बायोपिक आहे, यामध्ये सारा अली खानने तिची भूमिका साकारली आहे. भारताला स्वतंत्र सिद्ध करण्यासाठी आणि ब्रिटीश सरकारला वास्तवाचा आरसा दाखवण्यासाठी तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की ती स्वतःचे रेडिओ स्टेशन उघडते आणि चळवळीला चालना देण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी रेडिओ जॉकी बनते.
‘ए वतन मेरे वतन’: शैली, निर्माता, दिग्दर्शक आणि स्टारकास्ट : ‘ए वतन मेरे वतन’ हा एक ऐतिहासिक थ्रिलर-ड्रामा चित्रपट आहे. धर्मिक एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केले असून सारा अली खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ’नेल आणि आनंद तिवारी हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. ‘ए वतन मेरे वतन’मध्ये इमरान हाश्मी खास पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटियाने चित्रपटसृष्टीत केली 19 वर्षे पूर्ण; कसा होता संपूर्ण प्रवास जाणून घ्या
हा चित्रपट 21मार्च रोजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सारा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबतचं कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘इतिहासाच्या सावलीतून अद्भुत धैर्याची कहाणी उभी राहते.’ ऐतिहासिक थ्रिलर-ड्रामा फिल्म ‘ए वतन मेरे वतन’ 21 मार्च 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.