Download App

Saade Maade Teen Sequel: अशोक मामाचा आणखी एका गाजलेल्या सिनेमाचा सीक्वेल; हा सुपरस्टार करतोय दिग्दर्शन

Punha Sade Made Teen : 17 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही त्रयी आता पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Punha Sade Made Teen: 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘साडे माडे तीन’ ( Sade Made Teen) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. (Punha Sade Made Teen) चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सर्वांची जमेची बाजू आहे. यामुळेच प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रेम केले आहे. (Marathi Movie) सिनेमातील अशोक मामा, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे ही कुरळे ब्रदर्सची तिकडी सगळयांना चांगलंच भावली आहे. या तिघांची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अनुभवयाला मिळणार असून लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


नुकतचं या चित्रपटाची सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे ‘साडे माडे तीन’मधील कलाकारच मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आणि आणखी या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे मात्र अद्यापही गुपित ठेवण्यात आले आहे. अमेय विनोद खोपकर पिक्चर्सच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह ‘उदाहरणार्थ’चे सुधीर कोलते यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार असल्याची चर्चा सुरु आहे. येत्या सप्टेंबरपासून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरीने सांगितले आहे की, या चित्रपटाच्या निमित्ताने मी प्रथमच एव्हीके पिक्चर्स आणि उदाहरणार्थसोबत काम करत आहे आणि यापूर्वी एव्हीके पिक्चर्सने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चितच कमाल असणार आहे. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एका वेगळया उंचीवर जाईल, यात शंका नाही.

FIR No 469: किरण गायकवाड नव्या रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एफआयआर नंबर 469’ सिनेमाचे पोस्टर लॉन्च

या सिनेमाच्या टीमने मराठी सिनेसृष्टीला एक अनोखं स्थान मिळवून दिले आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणे, हे खरंच खूपच महत्वाचे काम असते. प्रेक्षकांच्या वाढत असलेल्या अपेक्षा. मला खात्री आहे की, ‘साडे माडे तीन’वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले, तसेच या चित्रपटावर देखील करतील. या भागात कुरळे ब्रदर्सची जोडी ही धमाल डबल झाली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

follow us