Download App

अंकुश चौधरीचे आगळे वेगळे रक्षाबंधन! रेल्वे अपघातात अपंगत्व आलेल्या परिचारिकेच केलं औक्षण

Ankush Chaudhary : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा लोकमान्य टिळक रुग्णालयात साजरा झाला. रेल्वे अपघातात एक पाय आणि एक हात गमवावा लागलेल्या परिचारिका प्रिया वाखरीकर यांना अभिनेता अंकुश चौधरीने राखी बांधून औक्षण केले. प्रिया वाखरीकर यांच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर्षीचा रक्षाबंधन सण त्यांच्या कायम स्मरणात राहील अशा प्रकारे साजरा झाला.

प्रिया वाखरीकर या लोकमान्य टिळक रुग्णालयात गेली 30 वर्षे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. 22 जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामावर निघालेल्या प्रिया यांच्यावर नियतीने घाला घातला. आसनगाव रेल्वे स्थानकात पहाटे लोकल पकडताना झालेल्या अपघातात त्यांना डावा पाय आणि डावा हात गमवावा लागला.

त्यांचा आवडता अभिनेता अंकुश चौधरी रुग्णालयात त्यांना भेटायला आला. अशोक मुळ्ये यांच्या विनंतीला मान देऊन आलेल्या अंकुशने प्रिया वाखरीकर यांच्या हातावर राखी बांधली, त्यांचे औक्षण केले आणि प्रेमाची भेट म्हणून त्यांना साडी दिली.

भारत-चीनमध्ये दरी वाढली? चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी जी-20 परिषदेकडे पाठ फिरवली…

उपचारानंतर बरे झाले की कृत्रिम हात व पाय यांच्या बळावर ‘रुग्णसेवा ही ईश्वर सेवा’ हे आपले व्रत यापुढेही सुरू ठेवेन, असे प्रिया वाखरीकर यांनी सांगितले तर हे नाते आजच्या दिवसापुरते नसून आयुष्यभरासाठी असेल, अशी ग्वाही अंकुशने दिली.

हा प्रसंग आनंद देणारा असला तरी असे प्रसंग माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ नयेत, असे अशोक मुळ्ये यांनी सांगितले. रुग्णालयातील प्रमुख अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Mumbai Ganeshotsav 2023 : 66 किलो सोन्याने मढलेल्या गणपतीचा 360 कोटींचा विमा

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे हिला अशोक मुळ्ये यांनी उपचारांकरिता आर्थिक मदत मिळवून दिली होती. मोनिका रुग्णालयात असताना तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अभिनेते भरत जाधव यांना घेऊन ते तिला भेटायला गेले होते.‌

घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या पण घटस्फोट न घेता पुन्हा जोडीने नवे आयुष्य सुरु करणाऱ्या काही जोडप्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, कर्करोगावर जिद्दीने मात करून बरे झालेल्या कर्करोगमुक्तांचा मेळावा, ज्येष्ठ रंगकर्मी संमेलन, माझा पुरस्कार हे आणि इतर अनेक आगळे कार्यक्रम अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून आत्तापर्यंत सादर झाले आहेत.

Tags

follow us