Mumbai Ganeshotsav 2023 : 66 किलो सोन्याने मढलेल्या गणपतीचा 360 कोटींचा विमा
Mumbai Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील सर्वच गणेश मंडळांची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील गणेशोत्सवाचा श्रीमंत थाट असतो. मुंबईतील अनेक गणेश मंडळे प्रसिद्ध आहेत. तेथे गणेशोत्सवासाठी लाखो लोक येत असतात. मुंबईतील सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून किंग सर्कलच्या जीएसबी (GSB) गणपती सेवा मंडळाची ओळख आहे. या मंडळाने आता विमा उतरविण्याचा विक्रम केला आहे. यंदा मंडळाने तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा संरक्षण घेतले आहे.
Sukhee Trailer: ठरलं तर मग! शिल्पा शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा ट्रेलर येणार ‘या’ दिवशी
हे विमा संरक्षण केवळ गणशोत्सव काळातील दहा दिवसांसाठी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत विमा रक्कमही वाढली आहे. गेल्या वर्षी 316 कोटींचा विमा उतरविण्यात आला होता.यंदा त्यात तब्बल 44 कोटींची विमा रक्कम वाढली आहे. मुंबईतील किंग्ज सर्कल येथे हे मंडळ असून, गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाचा हा गणपती आहे. यंदा या मंडळाचे 69 वे वर्ष आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने हा विमा उतरविला आहे. गणपती बाप्पाला तब्बल 66 किलो सोने आणि 295 किलोच्या चांदीच्या दागिन्याने सजविले जाते.
Dono Trailer : राजवीर-पालोमाची लव्ह स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘दोनों’चा ट्रेलर प्रदर्शित
विमा उतरविण्याबाबत मंडळाचे विश्वस्त यांनी अमित पै यांनी माहिती दिली. यात 38 कोटी 47 लाख रुपये सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या संरक्षणासाठी आहे. तर दोन कोटी रुपये हे आगीच्या धोक्यासाठी, भूकंपासाठी आहेत. तर बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनाही विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर तब्बल 289 कोटी 50 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. यात मंडळाचे कर्मचारी आणि स्वंयसेवकाचा वैयक्तिक अपघात विमा आहे.
बाप्पाच्या प्रसादालाही विमा संरक्षण
ओरंटल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक सचिन खानविलकर म्हणाले, आतापर्यंत 22 गणेश मंडळाने विमा उतरविले आहेत. त्यात सोने, चांदीचे दागिने, दानपेटीचा विमा उतरविण्यात आला आहे. सोसायटीच्या गणपतीसाठी एक ते दोन लाखांचे दागिने वापरले जातात. त्याचा विमा उतरविण्यात येत आहे. दागिन्यांच्या संरक्षणाबरोबरच कार्यकर्त्यांचा विमा उतरविला जात आहे. नैसर्गिक आपत्ती, दहशतवाद, प्रसाद सेवनातून आपत्ती ओढवल्यास याबाबीसाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे.