Sukhee Trailer: ठरलं तर मग! शिल्पा शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा ट्रेलर येणार ‘या’ दिवशी

Sukhee Trailer: ठरलं तर मग! शिल्पा शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा ट्रेलर येणार ‘या’ दिवशी

Sukhee Trailer: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कुंद्राच्या आगामी चित्रपट “सुखी”चा (Sukhee Hindi Cinema) बहुप्रतिक्षित ट्रेलर 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून शिल्पा चे चाहते यासाठी चाहते मोठे उत्सुक झाले आहेत. (Social media) शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या “सुखी” मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ट्रेलर रिलीजच्या बातमीने आता सगळ्यांना ट्रेलरची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)


अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी कुंद्राची उत्क्रांती अफलातून आहे. तिच्या आगामी चित्रपट “सुखी” साठी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली असून 6 सप्टेंबरला ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे सगळेच वाट बघत आहेत. सिनेमाची कथा आणि पात्रांची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा वाढवत आहे. चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “सुखी” एक अत्यंत अपेक्षित सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अफलातून प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. 6 सप्टेंबर रोजी “सुखी” ट्रेलर रिलीज होणं हे शिल्पासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.

‘सुखी’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा शर्मा यांनी केली आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत कुशा कपिला, दिलनाज इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाची कथा राधिका आनंदने लिहिली असून पटकथा पाउलोमी दत्ताने लिहिली आहे.

Nargis Fakhri On Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्रीने मानले तिच्या खास व्यक्तीचे आभार !

‘सुखी’ची कथा गृहिणीभोवती फिरत आहे. सुखप्रीत कालरा उर्फ ‘सुखी’ ही ३८ वर्षीय पंजाबी गृहिणी दाखवण्यात आली आहे. जी 20 वर्षांनंतर त्यांच्या शाळेच्या रियुनियन कार्यक्रमासाठी दिल्लीला जाते. ‘सुखी’ ही प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. बर्‍याच अनुभवांमधून जात असताना, ती पहिल्यांदाच स्वतःला आई आणि पत्नी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून पाहते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube