Download App

चाहत्यांची प्रतिक्षा संपली; ‘या’ दिवशी येणार फरहान अख्तरची मेड इन हेवनचा सीजन 2

Made in Heaven Season 2 : फरहान अख्तर निर्मित त्याचबरोबर शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथुरची मुख्य भूमिका असलेल्या मेड इन हेवन वेब सीरीजच्या सीजन 2 ची घोषणा करण्यात आली आहे. चाहते या सीरीजच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरीजचा पहिला भाग 2019 मध्ये आला होता. ( Announcement of Made in Heaven Season 2 )

मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपची तर जिरणार नाही ना? कार्यकर्त्यांचं फडणवीसांना पत्र

आज या सीरीजच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. ही सीरीज दोन लग्नाचे आयोजन करणाऱ्यांभोवती फिरणारी आहे. यामध्ये ताराची भूमिका शोभिता आणि करणची भूमिका अर्जुनने साकारली आहे. त्यांच्या व्यवसायासह त्यांच्या खासगी आयुष्यात देखील चढ उतार येतात अशी ही सीरीज आहे.

Video : राहुल गांधींचा ‘मोहब्बते’ रिलीज…; पीएम मोदींना दिला थेट इशारा

ही सीरीज अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. झोया अख्तर आणि रीमा कागतीने या सीरीजची निर्मीती केली आहे. तर झोया अख्तर, रीमा कागती, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरने मिळून निर्मित केली आहे. फरहानने या वेब सीरीजच्या घोषणेबाबत सेशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

शिंदे गटाचे नाराज आमदार आमच्या संपर्कात; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

या सीरीजमध्ये शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथुरची मुख्य भूमिका आहे. तर कल्कि कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी, जिम सरभ यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.

Tags

follow us