Video : राहुल गांधींचा ‘मोहब्बते’ रिलीज…; पीएम मोदींना दिला थेट इशारा
Rahul Gandhi Video : आज काँग्रेसने (Congress)राहुल गांधींचा (Rahul Gandhi)’मोहब्बते’ रिलीज केला आहे. होय तुम्ही वाचताय ते खरं आहे. अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्यातील संवादाप्रमाणेच या व्हिडीओमध्ये संवाद केले आहेत. या व्हिडीओमध्ये अॅनिमेटेड राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्याच पद्धतीने बोलत आहेत. यामध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये(Karnataka) तुम्हाला प्रेमाची ताकद (power of love)दाखवली आहे. तसेच आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्येही (Lok Sabha Elections)तुम्हाला प्रेमाची ताकद दाखवून देऊ, असा थेट इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांना दिला आहे. (Congress Video Rahul Gandhi PM Narendra Modi power of love Direct warning )
दाक्षिणात्य अभिनेत्री अन् रामचरणच्या बहिणीचा घटस्फोट; म्हणाली मी विनंती करते की…
काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ‘मोहब्बत की ताकत’ अशा टायटलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.हा अॅनिमेटेड व्हिडीओ 1.55 मिनिटांचा आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात की, मिस्टर मोदी तुम्ही संपूर्ण देशभरात धर्मा-धर्मामध्ये, जाती-जातीत तिरस्कार, द्वेष पसरवला आहे. हे अत्यंत वाईट आहे. देशातील हवा देखील आपल्याला घाबरते. त्यांनाही माहित आहे की, तुम्हाला प्रेम, भाईचारा आवडत नाही. तुम्ही देशभरात सर्वांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून घाबरवलं आहे. धाकात ठेवलं आहे.
अमेरिकेत गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, दोन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात
त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, राहुल सत्ता चालवण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे भीती आणि द्वेष. मी सत्तेमध्ये आहे कारण लोक मला घाबरतात. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की, प्रेम आणि द्वेषामध्ये विजय कायम द्वेषाचाच होतो.
मोहब्बत की ताकत ❤️💪🏼 pic.twitter.com/sLcRxNEf9y
— Congress (@INCIndia) July 6, 2023
त्यावर राहुल गांधी म्हणतात की, नाही नाही, मिस्टर मोदी, द्वेषामध्ये ताकद असते हा आपला गैरसमज आहे. प्रेमाची ताकद तर आपण पाहिलीच नाही. प्रेमात एवढी ताकद आहे की, तुमच्या अहंकार, भीती आणि द्वेषाच्या इमारतीची एकेक वीट हालवू शकते. प्रेम भारत देशाला जोडते. प्रेमामुळे एकमेकांमधील धर्मा-धर्मातील, जाती-जातींमधील संपते. प्रेम असं असतं की, जेव्हा एक हात पुढे केल्यावर त्याच्यासाठी 100 हात पुढे येतात.
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना 15 दिवसांचा अल्टिमेटम
त्यावर मोदी म्हणतात की, मिस्टर राहुल अशी ताकद मला देखील पाहायची आहे. याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणतात की, आता नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधासभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. त्याचबरोबर आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकांमध्येही दाखवून देऊ, असा थेट इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. या व्हिडीओच्या शेवटी तुमच्या द्वेष आणि तिरस्काराच्या बाजारामध्ये माझ्या प्रेमाचाच डंका वाजेल, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कॉंग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं आहे. हा व्हिडीओ अनेकांनी युजर्सनी शेअर केला आहे.