अमेरिकेत गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, दोन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात
अमेरिकेतील जॉर्जिया येथील एका किराणा स्टोअरमध्ये लिपिक म्हणून काम करणाऱ्या 36 वर्षीय भारतीय वंशाच्या मनदीप सिंगची अल्पवयीन मुलांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो एका महिन्यापासून इथे काम करत होता. ( Shooting in America; One Indian killed, two minors detained)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या रात्री 8.37 वाजता दोन अल्पवयीन मुले रेन्स फूड मार्टमध्ये पोहोचली. दरोड्याच्या उद्देशाने आरोपी तेथे पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी तेथे काम करणाऱ्या मनदीपवर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्यांचे चेहरे झाकले नव्हते. व्हिडिओ फुटेजवरून त्याची ओळख पटली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. पहिला संशयित चार तासांत सापडला. मनदीपचा मृतदेह जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
ऑगस्टा शहरात राहत होता भारतीय
वृत्तानुसार, व्रेन्स शहरातील ‘व्रेन्स’ या किराणा दुकानात काम करणाऱ्या मनदीप सिंगवर 28 जून रोजी दोन 15 वर्षांच्या मुलांनी गोळ्या झाडल्या होत्या. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टा शहरातील रहिवासी सिंग हा एका महिन्यापासून त्या दुकानात काम करत होता.