प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना 15 दिवसांचा अल्टिमेटम

प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना 15 दिवसांचा अल्टिमेटम

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Alliance) केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती सोबत (BRS) युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशाचत आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) टेन्शन वाढवलं. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी येत्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. लवकर निर्णय न झाल्यास आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असे मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. आंबेडकरांचे हे विधान बीआरएस सोबतच्या संभाव्य तिसऱ्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संकेत मानलं जात आहे. (Prakash Ambedkars 15 day ultimatum to Uddhav Thackeray)

प्रकाश आबंडेकरांनी आज अकोल्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आम्ही शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती केली. वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशबाबद्दल शिवसेना आग्रही आहे. मात्र जो प्रतिसाद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मिळायला पाहिजे, तो मिळत नाही. कॉंग्रेसकडून जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो मिळत नाही. त्यामुळं महाविकास आघाडीत आमचा समावेश होणार की नाही, हे अजून स्पष्ट नाही, असं आंबेडकर म्हणाले.

Punjab and Sind Bank : पंजाब & सिंड बॅंकेत 183 पदांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज 

ते म्हणाले, आता NCP चे लोक निराळी भूमिका घेत आहेत. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार असं त्यांच्याकडून माध्यमांना सांगण्यात येत. शिवाय, कॉंग्रेसचे नाना पटोलेही कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार असं सांगतात. त्यामुळं आता शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत काय बोलणं झालं, हे स्पष्ट करावं. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उध्दव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली. वंचितचा महाविकास आघाडीत समावेश होणार आहे की, नाही? हे स्पष्ट करावं. आपल्याला एकत्र लढायचं झाल्यास लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे आहोत, असा इशारा आंबेडकारंनी दिला.

शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर हाच प्रयोग पुन्हा होतांना दिसतो. मात्र, एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र, यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं. त्यामुळं वंचितचा महाविकास आघाडीत समावेश होतो की, नाही हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube