Anupam Kher : शूटिंगदरम्यान अनुपम खेर गंभीर जखमी; फ्रॅक्चर झालेला फोटो शेअर करुन दिली माहिती

Anupam Kher Injured: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) बॉलिवूडमधील सर्वात अॅक्टिव्ह अभिनेते मानले जातात. (Anupam Kher Injured) या वयामध्ये त्यांचा उत्साह हा वाखणण्याजोगा आहे. अनेक धाटणीच्या भूमिका अगदी उत्तमपणे साकारणं हेच त्यांचं कौशल्य आहे. नुकतंच त्यांनी केलेल्या एका सोशल मीडिया (Social media) पोस्टमुळे चाहत्यांना मोठी काळजी लागली आहेत.   View this post on Instagram […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 22T134305.914

Anupam Kher

Anupam Kher Injured: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) बॉलिवूडमधील सर्वात अॅक्टिव्ह अभिनेते मानले जातात. (Anupam Kher Injured) या वयामध्ये त्यांचा उत्साह हा वाखणण्याजोगा आहे. अनेक धाटणीच्या भूमिका अगदी उत्तमपणे साकारणं हेच त्यांचं कौशल्य आहे. नुकतंच त्यांनी केलेल्या एका सोशल मीडिया (Social media) पोस्टमुळे चाहत्यांना मोठी काळजी लागली आहेत.


अनुपम खेर यांना शूटच्या दरम्यान त्यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली आहे, त्याचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. अभिनेते अनुपम खेर सध्या ‘विजय 69’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हा खेळावर आधारित सिनेमा आहे. या दरम्यान त्यांच्या खांद्याला जोरदार मार बसला आहे. फ्रॅक्चर झालेला फोटो त्यांनी इन्स्टाग्रावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही खेळावर आधारित एखादा सिनेमा करा आणि दुखापत होणार नाही, असं कसं होईल? काल विजय 69 च्या शूटिंगच्या दरम्यान खांद्याला जोरदार फटका बसला आहे. खूप दुखतंय पण sling लावणारे भैय्या म्हणाले की त्यांनी शाहरुख, हृतिक यांच्या खांद्यावर उपचार केले होते. हे ऐकल्यावर कसं काय माहित पण वेदना कमी झाल्या. पण आता मी थोडाजरी जोरात खोकलो तर तोंडातून हलकी किंचाळी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

या फोटोमध्ये प्रामाणिकपणे हसण्याचा प्रयत्न केला आहे. एक दोन दिवसांनंतर शूटिंगला सुरुवात करणार आहे. तिकडे आईला समजल्यावर ती म्हणाली, अजून दाखव जगाला तुझी बॉडी. तुला नजर लागली. अनुपम खेर यांनी दुखापतीतही ह्युमर दाखवला आहे आणि चाहत्यांचं नेहमी मनोरंजनच केलं आहे. कमेंटमध्ये सर्वांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. सध्या ते अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. मात्र आता दुखापतीमुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात डॉक्टरानी दिला आहे.

Exit mobile version