Anupama Welcome Tulsi : वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आणि भारतीय टेलिव्हिजनला नवी ओळख देणारा शो – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Saas Bhi Kabhi Bahu Thi) आता पुन्हा एकदा परततोय! आजपासून दररोज रात्री 10.30 वाजता, फक्त स्टार प्लसवर. हा शो (Anupama) केवळ एक मालिका नव्हती, तर ती होती कुटुंबांची नाळ जोडणारी एक भावना.‘तुलसी’च्या (Tulsi) त्या अमूल्य मूल्यांसह आता या मालिकेचा नवा अध्याय सुरू होतोय.
राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार; फडणवीस सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
सामान्य जीवनातल्या खास नात्यांना स्पर्श करणाऱ्या या मालिकेचा नवीन (Entertainment News) सीझन घेऊन आलाय नवीन पात्रं, नवीन कहाण्या आणि जुन्याच आठवणी. पण त्यातलं तेच हृदयस्पर्शी ‘इमोशनल कोर’ आणि परंपरांचं बळ आजही कायम आहे, जे पुन्हा एकदा घराघरांतील स्त्रीचा आवाज ठामपणे मांडणार आहे.
‘ब्रह्मास्त्रमधील ‘केसरिया’ टीम पुन्हा एकत्र; अयान मुखर्जींच्या ‘वॉर 2’ मध्ये होणार धमाका
याच पार्श्वभूमीवर एक खास सरप्राईज देण्यात आलं, नुकतंच एक प्रोमो रिलीज झाला, जिथं अनुपमा आणि तुलसी यांची व्हिडिओ कॉलवर भेट होते. अनुपमा तिच्या खास स्टाईलमध्ये हसून म्हणते, वेलकम बॅक टू द फॅमिली तुलसीजी! हा क्षण म्हणजे एक आयकॉनिक स्त्रीकडून दुसऱ्या आयकॉनिक स्त्रीला दिलेला आदर आणि टेलिव्हिजनच्या प्रवासाचा एक सुंदर सोहळा होता.
भारतीय टिव्हीवरील दोन सर्वात प्रिय पात्रं – तुलसी आणि अनुपमा यांचं हे खास ‘मिलन’ पाहून प्रेक्षक आता अधिकच उत्सुक झाले आहेत. संपूर्ण देशभरातून चाहते वाट पाहत आहेत की, तुलसी पुन्हा त्यांच्या घरात आणि हृदयात परत यावी.