हरियाली तिजचं निमित्त! स्मृती इराणींची कुमार विश्वास यांच्या घरी खास भेट, ‘सास बहू’च्या भावनांना पुन्हा उजाळा

हरियाली तिजचं निमित्त! स्मृती इराणींची कुमार विश्वास यांच्या घरी खास भेट, ‘सास बहू’च्या भावनांना पुन्हा उजाळा

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ हा शो भारतीय (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) प्रेक्षकांसाठी केवळ एक मालिका नव्हती, तर एक भावनिक प्रवास होता. नात्यांचे विविध पैलू, भारतीय संस्कृतीतील कुटुंबव्यवस्थेचा आदर्श, आणि सासू-सुनेच्या नात्यातील गोड-तोड संबंध या सर्व गोष्टींनी (Smriti Irani) ही मालिका घराघरात पोहोचली. आता या मालिकेचा (Entertainment News) नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याच पार्श्वभूमीवर एक खास प्रसंग नुकताच घडला.

स्मृती इराणी यांची खास भेट

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मंगळवारी प्रसिद्ध कवी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचल्या. या भेटीचे औचित्य होते ‘हरियाली तीज’ हा पारंपरिक सण. स्मृती इराणी यांनी कुमार विश्वास यांच्या कन्येला खास तीजचे पारंपरिक भेटवस्तू देत हा सण साजरा केला. स्मृती इराणी त्या मुलीला आपली भाची मानतात. त्यामुळे ही भेट अधिक भावनिक ठरली.

ठाकरे-शिंदे सेना एकत्र येणार? ‘संधी पाहून राजकारण महाराष्ट्रात नवं नाही….’ नक्की काय म्हणाले संजय शिरसाठ

रक्ताचं नातं नसूनही ऋणानुबंध

स्मृती इराणी आणि विश्वास कुटुंबातील ही भेट प्रेम, आपुलकी, आणि भारतीय मूल्यांची एक सुंदर झलक होती. रक्ताचं नातं नसतानाही दोघांमधील आदर, आपुलकी आणि परंपरेची जाण यामुळे या भेटीला एक वेगळंच महत्त्व लाभलं. त्यांच्या या भेटीतून हेच दिसून येतं की, भारतात नातेसंबंध केवळ जन्मानेच नव्हे, तर भावनेने आणि संस्कारांनी देखील घडतात.

मोठी बातमी ! राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची गळाभेट दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुन्हा जिवंत होणार नाती

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा नवीन सीझन हा केवळ एका प्रसिद्ध शोची पुनरावृत्ती नाही, तर एका कालखंडाची, आठवणींची आणि नात्यांची पुन्हा उभारी आहे. कुटुंब, प्रेम, परंपरा आणि मूल्यांचा संगम असलेल्या या मालिकेतून पुन्हा एकदा त्या काळच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. मंगळवार, 29 जुलै रोजी रात्री 10:30 वाजता फक्त स्टार प्लसवर या शोचे प्रसारण होणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube