‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित!

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Series Promo Released : ‘स्टार प्लस’ वाहिनी (Star Plus) नेहमीच भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या रूजलेली कौटुंबिक नाट्ये सादर करण्यात अग्रेसर राहिली आहे. या मालिकांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. देशाच्या छोट्या पडद्यावरील कथाकथनाच्या सीमांना पार करत वेगळे काहीतरी देऊ करणारी ही वाहिनी नातेसंबंध, (Entertainment News) मूल्ये आणि भारतीय घराघरांत होणारी स्थित्यंतरे मालिकांद्वारे टिपत राहिल्याने प्रेक्षकांशी सातत्याने जोडलेली राहिली. ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या सर्वात प्रतिष्ठित निर्मितींपैकी एक असलेली ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) ही मालिका केवळ सास-बहू शैली पुनर्परिभाषित करते असे नाही, तर ही मालिका लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहे.
या मालिकेच्या नव्या सीझनच्या घोषणेमुळे सोशल मीडियावर नवे वादळ निर्माण झाले होते. पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर हा उत्साह एका नव्या उंचीवर गेला. मालिकेच्या थीम ट्यूनने प्रेक्षकांच्या आठवणी जागवल्या आणि नव्या सीझनची मोठी चर्चा सुरू झाली. या प्रोमोला डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांनीही मोठा प्रतिसाद दिला. पहिल्या प्रोमोने केवळ नव्या, आगामी सीझनची झलक दाखवली असे नाही, तर या प्रोमोत तुलसीचा लूकदेखील सर्वांसमोर आला, ज्यात एक डौल होता आणि सामर्थ्यही होते. या प्रोमोने चाहत्यांना त्यांच्या आवडत्या आणि त्यांनी भरभरून कौतुक केलेल्या शक्तिशाली मातृसत्तेची आठवण करून दिली.
TRF वर अमेरिकेची मोहर! पाकिस्तानचा पारा चढला, भारतावरच उलटे आरोप
आता, नवा प्रोमो दाखल झाल्यानंतर, निर्मात्यांनी व्हिडिओ कॅप्शनसह तो शेअर केला आहे. त्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत- बदलते वक्त में एक नए नजरिए के साथ लौट रही है तुलसी! उनके इस नये सफर में जुडने के लिए क्या आप हैं तय्यार? देखिये # क्यूंकी सास भी कभी बहू थी, 29 जुलाई से, रात साडेदस बजे, सिर्फ स्टार प्लस पर और कभीभी जिओस्टार पर. हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भावनिक तारा झंकारतो. नॉस्टॅल्जियामध्ये एक नवा दृष्टिकोन मिसळतो. प्रोमोच्या सुरुवातीला तुलसी भूतकाळातील आठवणी शेअर करताना दिसते. पुढे काय घडणार आहे, याची ती मांडणी करते. गोम्झीच्या शर्टवर त्याचे नाव लिहिलेले असल्यापासून, सास-बहू नातेसंबंधातील गडबड-गोंधळ लक्षात ठेवण्यापर्यंत, ती बदलत्या काळाविषयी बोलते तसेच एखाद्याच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व कथन करते.
या प्रोमोतून आधुनिक आव्हानांना तोंड देणाऱ्या तुलसीची ताकद आणि खोलवर रूजलेल्या कौटुंबिक परंपरा ठळकपणे दिसून येतात. हा प्रोमो भूतकाळातील परिचित आकृतिबंधांपासून पुनर्कल्पित वर्तमानकाळातील दृश्यांकडे वळतो. ज्यामुळे आठवणी आणि आधुनिकतेची यांत सहज सरमिसळ होते. ही केवळ एक मालिका नाही तर भावनांचा पुनर्जन्म आहे, याची एक शक्तिशाली आठवण करून देत हा प्रोमो संपतो.
देशभरातील बुद्धिबळपटूंनी गाठले अहिल्यानगर; ‘नरेंद्रजी फिरोदिया चषक’ स्पर्धेची रंगत
गेल्या काही वर्षांत, ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ केवळ एक दैनंदिन मालिका राहिली नाही, तर ती एक सांस्कृतिक घटना बनली. विराणी कुटुंब आणि त्यांचे शांतिनिकेतन घर हे घरोघरी लोकप्रिय झाले, भारतीय दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकांच्या सामूहिक स्मृतीत खोलवर रूजले. तो वारसा पुन्हा प्रसारित होण्याद्वारे, फॅन क्लबद्वारे आणि आता, एका नवीन सीझनद्वारे जिवंत आहे.
29 जुलैपासून रात्री 10:30 वाजता केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’चा भव्य प्रीमियर बघायला विसरू नका.