Download App

Anushka Sharma: प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माची ‘ती’ पोस्ट व्हायरल; म्हणाली…

Anushka Sharma: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र अनुष्का आणि विराटने (Virat Kohli) अद्याप याची पुष्टी केलेली नाही. मात्र, हे वृत्त अफवा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर (social media) पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगत आहे. तिच्या चाहत्यांनीही अभिनेत्रीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.


अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार? अनुष्का शर्माने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गर्भधारणा चाचणी किटची जाहिरात शेअर केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत अनुष्का आणि विराटचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अनुष्का हावभावातून ती गरोदर असल्याचा अंदाज लावला जात आहे.

कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आम्हाला तुमचे हावभाव समजले.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहात.’ त्यामुळेच पोट लपवण्यासाठी तिने महिनाभर जाड कपडे घातले होते.’ असे एका यूजरने लिहिले आहे. छोटा विराट येणार आहे. एका यूजरने म्हटले, ‘अनुष्का शर्मा प्रेग्नंट कन्फर्म.’ तर आणखी एका यूजरने लिहिले, ‘ओएमजी वामी लवकरच मोठी बहीण होणार आहे, अशा भन्नाट कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Kangana Ranaut: ‘पंगाक्वीन’ 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? वडिलांकडून मोठा खुलासा

नुकतचं हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, अभिनेत्री मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाली होती. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये ती पती विराट कोहलीसोबत पोज देताना दिसली. त्याच फोटोमध्ये ती तिच्या बेबी बंपला स्पर्श करताना दिसत आहे. मात्र, नंतर हा फोटो एडिट करून दिवाळीच्या वेळी क्लिक करण्यात आल्याचे आढळून आले. अनुष्का आणि विराटने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या टस्कनी येथे लग्न केले आणि 2021 मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे वामिकाचे स्वागत केले होते.

Tags

follow us

वेब स्टोरीज