Download App

Aparshakti Khurana: अपारशक्ती खुरानाचा ‘आपा फिर मिलांगे’ नवं गाणं लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aparshakti Khurana Apa Fer Milaange Song: अभिनेता आमीर खान अभिनीत ‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना घराघरात पोहचला.

Aparshakti Khurana Apa Fer Milaange Song: अभिनेता आमीर खान अभिनीत ‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) घराघरात पोहचला. या सिनेमात तो हरियाणवी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. (social media) त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर आता अभिनेता- गायक अपारशक्ती खुराणा ज्याने केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक गायक म्हणून देखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.


अभिनेत्याने अलीकडेच सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ टाकला. ज्यामध्ये तो ‘आपा फिर मिलांगे’ फेम गायक-संगीतकार सावी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. कहलों. व्हिडिओमध्ये ‘आपा फिर मिलांगे’साठी सावीसोबत अपारशक्ती जॅम करताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी अपारशक्ती काही गाण्याचे बोल गाताना दिसतोय.

जे त्याच्या आगामी ट्रॅकमधील असल्याचे दिसते. अपारशक्ती खुराणा यांनी वेळोवेळी आपले संगीत कौशल्य सिद्ध केले आहे. दरम्यान थिएटरच्या रिलीज मध्ये अपारशक्ती खुराणा स्टारर ‘बर्लिन’ साठी उत्सुक आहे. तो आगामी हॉरर कॉमेडी ‘स्त्री 2’ सोबत पुन्हा ‘बिट्टू’च्या शूजमध्ये येण्याची तयारी करत आहे. याशिवाय ॲपलॉज एंटरटेनमेंटचा ‘फाइंडिंग राम’ हा डॉक्युमेंटरीही त्यांच्याकडे आहे. तो सध्या ‘बदतमीज गिल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. ज्यामध्ये तो पहिल्यांदा वाणी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Box Office: दुसऱ्या आठवड्यात घटली ‘श्रीकांत’ची कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटवर ‘स्त्री 2’ मध्ये बिट्टूच्या त्याच्या प्रिय भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. त्याचा ‘बर्लिन’ हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ‘फाइंडिंग राम’ आणि नवज्योत गुलाटी दिग्दर्शित ‘बदतमीज गिल’ नावाच्या माहितीपटात देखील दिसणार आहे, आणि तो वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

follow us