Box Office: दुसऱ्या आठवड्यात घटली ‘श्रीकांत’ची कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Box Office: दुसऱ्या आठवड्यात घटली ‘श्रीकांत’ची कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Srikanth Box Office Collection Day 14: राजकुमार रावचा (Rajkummar Rao) ‘श्रीकांत’ (Srikanth Movie) चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 14 दिवस झाले आहेत. या चित्रपटाच्या कमाईत सतत चढ-उतार होत आहेत, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) आपली पकड मजबूत केली आहे. यासह हा चित्रपट दररोज एक कोटींहून अधिक कमाई करत आहे. ‘श्रीकांत’ने रिलीजच्या 14व्या दिवशी किती कलेक्शन केले आहे चला तर मग जाणून घेऊया?

 

View this post on Instagram

 

A post shared by Consulate General of Italy in Mumbai (@italyinmumbai)


‘श्रीकांत’ने 14व्या दिवशी किती कमाई केली?

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ या चित्रपटाच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही आतुरतेने वाट पाहिली जात होती. चित्रपटगृहात दाखल झाल्यानंतर ‘श्रीकांत’ची सुरुवात संथ झाली असली तरी चित्रपटाची जबरदस्त कथा आणि राजकुमार रावच्या हृदयस्पर्शी अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. आता ‘श्रीकांत’ रिलीज होऊन दोन आठवडे उलटले आहेत आणि जर चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 2.25 कोटींची ओपनिंग केलेल्या ‘श्रीकांत’चे पहिल्या आठवड्याचे कलेक्शन 17.85 कोटी रुपये होते.

रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात, चित्रपटाने दुसऱ्या सोमवारी 1.5 कोटी रुपये, दुसऱ्या मंगळवारी 1.25 कोटी रुपये आणि दुसऱ्या बुधवारी 1.2 कोटी रुपये कमावले आहेत. आता या चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्या गुरुवारच्या कमाईचे आकडे आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ने रिलीजच्या 14 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी 1.40 कोटी रुपये कमवले आहेत. यासह ‘श्रीकांत’ची 14 दिवसांची एकूण कमाई आता 32.02 कोटी रुपये झाली आहे.

बाजीरावचं जम्मू-काश्मीरमध्ये खास मिशन; ‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणची पहिली झलक आली समोर

‘भैय्या जी’ ‘श्रीकांत’च्या कमाईला ब्रेक लावणार 

‘श्रीकांत’ने संथ गतीने कमाई करताना 30 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बजेट वसूल करण्यात हा चित्रपट आता 9 कोटी मागे आहे. ‘श्रीकांत’ 40 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. मात्र, राजकुमार रावच्या चित्रपटासाठी पुढचा रस्ता सोपा असणार नाही. खरंतर मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा “भैया जी” या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भावाची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत ‘श्रीकांत’च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. आता मनोज बाजपेयींच्या चित्रपटासमोर ‘श्रीकांत’ किती उभं राहतो हे पाहायचं आहे.

श्रीकांत’ हा नेत्रहीन उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी चित्रपट आहे. ‘श्रीकांत’मध्ये राजूकमार रावशिवाय अलाया एफ, ज्योतिका आणि शरद केळकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube