Download App

Aparshkti Khurana Video : ‘तेरे लिये प्यार बहुत है’ अपारशक्तीचं नवं रॅप सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला

Aparshkti Khurana Rap Song : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना ( Aparshkti Khurana ) याने देखील अभिनयात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात आता त्याचं एक हटके रॅप सॉन्ग ( Rap Song) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अपारशक्ती एक बहुवलयंकित कलाकार आहे. तो अभिनेता, रेडिओ जॉकी, संगीतकार, त्यात आता त्याच्या रॅप सॉन्गचाही समावेश झाला आहे.

ब्राह्मणांमध्ये शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही; भुजबळांनी टाकली ठिणगी

‘तेरे लिये प्यार बहुत है’
अपारशक्ती खुराना याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो मध्यरात्री एका स्टुडीओमध्ये हे गाणं गाताना दिसत आहे. ‘तेरे लिये प्यार बहुत है’ असे या गाण्याचे बोल आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना अपारशक्ती म्हणाला की, मध्यरात्री स्डुडीओमध्ये गाणं हे माझं सर्वात फेवरेट आहे. या गाण्यामध्ये त्याची व्हर्सटालीटी, एनर्जी दिसत आहे.

वरिष्ठांना नाहीत तर जिल्ह्यातील काही लोकांना एजंट म्हणालो, रोहित पवारांचे स्पष्टीकरण

अपारशक्ती खुरानाने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला आरजे म्हणून काम केलं. त्यानंतर सुत्रसंचालनही केलं. तर आमीर खानच्या दंगल चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर त्याच्या अभिनयाच्या करीअरला वेग आला. त्याने आलिया वरूणच्या बद्रीनाथ की, दुल्हनिया या चित्रपटात काम केले आहे. तसेच आता तो बब्बू की बारातमध्ये दिसणार आहे. त्यादरम्यान त्याची व्हर्सटालिटी दिसून येत आहे. त्याच्या या रॅप सॉन्गच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Tags

follow us