AR Rahman accused of copying song Delhi court imposes fine of Rs 2 crore in copyright case : प्रसिद्ध म्युझिक कंपोझर आणि सिंगर एआर रहमान संगीताच्या जगातील महारथी मानले जातात. मात्र त्यांचं नावं थेट एका कॉपीराईट केसमध्ये आलं आहे. कारण एआर रेहमानवर गाणं कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी एआर रेहमानला दिल्ली हायकोर्टाने 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. जाणून घेऊ नेमकं प्रकरण काय?
…तर मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल; आमदार आशुतोष काळेंचा प्रशासनाला कडक इशारा
मणि रत्नम यांनी दिग्दर्शित केलेला दाक्षिणात्य चित्रपट ‘पोन्नियिन सेलवन 2’ मधील गाणं ‘वीरा राजा वीरा’ संबंधित हे प्रकरण आहे. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या रॉय. चियान विक्रम आणि त्रिशा सह इतर कलाकार होते.या गाण्यावर गायक फैयाज वसीफुद्दीन डागरने कॉपीराइट संबंधि कोर्टमध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टाने एआर रेहमान आणि ‘पोन्नियिन सेलवन 2’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना तब्बल 2 कोटींचा दंड ठोठावला आहे.ही रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Pahalgam attack: गुजरात पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक; हजारहून अधिक बांगलादेशी ताब्यात
प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद फैयाजुद्दीन यांनी 2023 मध्ये कोर्टमध्ये याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, ‘पोन्नियिन सेलवन 2’ चं ‘वीर राजा वीर’ त्यांचे वडील नसीर फैयाजुद्दीन डागर आणि काका जाहिरुद्दीन डागर यांनी रचलेल्या ‘शिव स्तुति’ ची कॉपी आहे.तर या चित्रपटात या गाण्याचं कंपोझिशन एआर रेहमानने केलं आहे. त्यामुळे डागरने रहमान आणि मद्रास टॉकीजसह इतर गाणे चित्रपटामध्ये वापरण्यास मनाई करण्याची मागणी केली होती.
Iran Port Blast : मोठी बातमी! इराणच्या बंदरात स्फोट, 500 हून अधिक लोक जखमी
त्यामध्ये कोर्टाने ‘वीरा राजा वीरा’ गाणं ‘शिवा स्तुति’ शी अत्यंत मिळत जुळत आहे. त्यामिळे न्यायमूर्तींनी मेकर्स आणि रहमान यांना डागर परिवाराला क्रेडिट देण्यास सांगितले आहे. तसेच कोर्टाने एआर रेहमान आणि ‘पोन्नियिन सेलवन 2’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना तब्बल 2 कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच डागर कुटुंबाला 2 लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत.