Download App

AR Rahman यांच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; चाहत्यांनी व्यवस्थापकाच्या नावाने ओढले ताशेरे

AR Rahman: आपल्या संगीताने जगभरातील चाहत्यांची मने जिंकून घेणाऱ्या एआर रहमान यांच्या चाहत्यांची संख्या अगदी कोट्यवधींमध्ये आहे. एआर रहमानचे गाणे प्रत्यक्षात ऐकायला मिळावं याकरिता चाहते वाट बघत असतात. (Social media) परंतु आता हेच चाहते एआर रहमान यांच्यावर चांगलेच संतापले आहे. एआर रहमान यांची नुकतीच आयोजित करण्यात आलेली म्युझिक कॉन्सर्ट चाहत्यांच्या रागाचे कारण ठरल्याचे बघायला मिळत आहे. ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान यांच्या चेन्नईतील लाईव्ह कॉन्सर्टबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.

एआर रहमानच्या चाहत्यांनी कॉन्सर्ट व्यवस्थापनावर जोरदार टीका करत आहेत. या कॉन्सर्टमध्ये तिकीट खरेदी करून आलेल्या चाहत्यांना या सोहळ्याचा आनंद देखील घेता आला नाही. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. एआर रहमान यांची ही म्युझिक कॉन्सर्ट १० सप्टेंबर दिवशी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून चाहते या कॉन्सर्टची वाट बघत होते. परंतु जेव्हा ही कॉन्सर्ट झाली, तेव्हा चाहत्यांना काही अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ (Video) आणि फोटो शेअर करत या कॉन्सर्टच्या निकृष्ट व्यवस्थापनाबद्दल जोरदार संताप व्यक्त केला आहे.

तसेच मैफलीमध्ये उपस्थित चाहत्यांनी देखील आपला अनुभव सांगितला आहे की, त्यांना या म्युझिक कॉन्सर्टमध्ये अतिशय कठीण परिस्थितीला देखील सामोरे जावे लागले. यावेळी अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती तयार झाली होती. तसेच तिकीटं असून देखील अनेकांना कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळाला नसल्यचे सांगितले जात आहे. तर, लोकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे देखील परत करण्यात आले नाही. अशा अनेक गोष्टींबद्दल  चाहत्यांनी शोच्या टीमला धारेवर धरले आहे.

Kiran Mane: किंग खानमुळे किरण माने चर्चेत! काय आहे नेमकं प्रकरण?

या कार्यक्रमाला आलेल्या अनेकांनी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती अनुभवली आहे. काहींनी सांगितले आहे की, यावेळी आवाज देखील कमी होता आणि जे स्टेजपासून लांब होते, त्यांना तर आवाज देखील ऐकू येत नव्हता. सिनेमा व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ‘एआर रहमानच्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची ही स्थिती. या मैफिलीतून अनेकांना बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. अनेकांना पास असून देखील आत एन्ट्री देण्यात आली नाही. या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी तासन् तास प्रवास करणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली नव्हती.’ यानंतर आता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

Tags

follow us