Armaan Malik: आनंदाची बातमी! युट्यूबर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने दिला जुळ्या बाळांना जन्म

Armaan Malik Wife Payal Welcome Twins: प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा चार मुलांचा बाप झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकने (Kritika Malik) नं एका मुलाला जन्म दिला. आता त्याची पहिली पत्नी पायल मलिकने (Payal Malik) देखील जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अरमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T114709.839

Armaan Malik

Armaan Malik Wife Payal Welcome Twins: प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा चार मुलांचा बाप झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकने (Kritika Malik) नं एका मुलाला जन्म दिला. आता त्याची पहिली पत्नी पायल मलिकने (Payal Malik) देखील जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अरमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही गूडन्यूज दिली आहे.


अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉस्पिटलातील एक फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये अरमानचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. फोटोमध्ये अरमानची पहिली पत्नी पायल, दुसरी पत्नी कृतिका, अरमान आणि पायलचा मोठा मुलगा चिरायू हे दिऊन येत आहेत. फोटो शेअर करत अरमानने आनंदाची बातमी दिली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘पायल आई झाली आहे.

पायलने सांगितले होते की, तिची डिलिव्हरी १ मे रोजी होणार आहे. ५ मे रोजी डिलिव्हरी व्हावी, अशी पायलची इच्छा होती, कारण त्या दिवशी तिचा मोठा मुलगा चिरायूचा वाढदिवस आहे. मात्र, नववा महिना सुरू होताच पायलची डिलिव्हरी झाली आहे. आता पायलच्या जुळ्या मुलांना बघण्यासाठी चाहते मोठे उत्सुक झाले आहेत.

अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिकाचा ३ वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर काही दिवसाअगोदरच कृतिकाने देखील गूड न्युज दिली होती. त्यानंतर आता अरमानची पहिली पत्नी पायल मलिकनं जुळ्यांना जन्म दिला आहे. अरमानच्या कुटुंबाला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी अरमान मलिक म्हणाला, ‘हजार लोक कमेंट करत असतात. लोक माझे व्लॉग पाहतात. ज्यांचे विचार छोटे असतात ते अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स करत असतात. मी माझ्या कुटुंबाचे कोणतेही फोटो शेअर करेल. ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्समुळे मला काहीच फरक पडत नाही.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

कोण आहे नेमका अरमान मलिक?

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. तो युट्यूबवर त्याचे व्लॉग अपलोड करत असतो. अरमानने पायलबरोबर २०११ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये कृतिकाबरोबर दुसरे लग्न केले आहे. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींबरोबर एकाच घरामध्ये राहतो, अशी माहिती आहे.

Exit mobile version