Download App

अरमान मलिक दोन नाही तर चार महिलांचा पती; न्यायालयाने पाठवले समन्स

Armaan Malik : यूट्यूबर अरमान मलिक पुन्हा एकदा खाजगी आयुष्यामूळे चर्चेत आला आहे. हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन (Hindu Marriage Act) आणि

  • Written By: Last Updated:

Armaan Malik : यूट्यूबर अरमान मलिक पुन्हा एकदा खाजगी आयुष्यामूळे चर्चेत आला आहे. हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन (Hindu Marriage Act) आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली पटियाला न्यायालयाने अरमान मलिक (Armaan Malik) आणि इतर चार जणांना समन्स बजावले आहे. वकील दविंदर राजपूत (Davinder Rajput) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पटियाला न्यायालयाने अरमान मलिकसह इतर चार जणांना समन्स बजावले आहे. अरमान मलिकने चार वेळा लग्न करत हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन केला असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

वकील दविंदर राजपूत यांनी न्यायालयात सांगितले की, अरमान मलिकने चार वेळा लग्न केले आहे. यापैकी एक लग्न अल्पवयीन मुलीशी होता. त्यामुळे आम्ही हिंदू विवाह कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. याच बरोबर अरमान मलिकवर हिंदू देवतांची नक्कल करून अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे अरमान मलिकविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी या याचिकेत वकील दविंदर राजपूत यांनी केली आहे.

तर दुसरीकडे युक्तिवाद आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आता अरमान मलिक आणि इतर चार जणांना 2 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश अरमान, त्याच्या दोन सध्याच्या पत्नी पायल आणि कृतिका आणि एका एक्स पत्नीसाठी आहेत.

अरमान मलिकवर एका पत्नीसोबत बालविवाह केल्याचा आरोप आहे. या महिलेची ओळख सुमित्रा अशी आहे, जिच्यापासून अरमानला दोन मुले आहेत. त्याच्या दोन सध्याच्या पत्नी पायल आणि कृतिका मलिक आहेत. एका महिलेची ओळख लक्षद्वीप अशी आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की यूट्यूबरने त्याच्या लग्नांची वैधता स्पष्ट करावी.

अरमानविरुद्ध तीन खटले दाखल

1. जुलै 2025 मध्ये अरमान मलिक आणि बिग बॉस ओटीटी 3 स्पर्धक पायल मलिकने एका इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे वाद निर्माण केला. यामध्ये तिने त्रिशूळ आणि मुकुट सारख्या पारंपारिक चिन्हांसह देवी कालीचे रूप धारण केले होते. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 299 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. पायलने आता हा व्हिडिओ काढून टाकला आहे. या प्रकरणाची सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

2. दुसरा खटला बहुपत्नीत्वाचा आहे, ज्यामध्ये पाच जणांना समन्स बजावण्यात आले आहेत.

3. तिसरा खटला आयटी कायद्यांतर्गत आहे, ज्यामध्ये सोशल मीडियावरील चुकीचा कंटेंट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच न्यायाधीश 2 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी करतील.

29 ऑगस्टला मुंबईला जाणार अन् ओबीसीमधून आरक्षण घेणार ; हात लावून दाखवा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा 

अरमान मलिक कोण आहे?
अरमान मलिकचे खरे नाव संदीप आहे आणि तो हिसारचा रहिवासी आहे. अरमान पूर्वी एका खाजगी बँकेत काम करत होता. नंतर तो दिल्लीला गेला आणि कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्धी मिळवली. यूट्यूबवरील त्याच्या कंटेंटसोबतच अरमान मलिक त्याच्या दोन बायका आणि 4 मुलांमुळेही प्रसिद्ध झाला. यामुळे तो ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये दिसला. या शोमध्ये त्याच्या दोन्ही बायका पायल आणि कृतिका देखील अरमानसोबत दिसल्या.

follow us