29 ऑगस्टला मुंबईला जाणार अन् ओबीसीमधून आरक्षण घेणार ; हात लावून दाखवा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

29 ऑगस्टला मुंबईला जाणार अन् ओबीसीमधून आरक्षण घेणार ; हात लावून दाखवा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange : कुणीही आडवं आलं तरी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) जाणार आणि ओबीसीतून (OBC) आरक्षण घेणार असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. जरांगे पाटील आज लातूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तसेच जर सरकारने आम्हाला आरक्षण दिलं तर त्यांचे आम्ही गुलाल लावून आभार मानणार आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईतून हालणार नाही असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई’ ची हाक दिली आहे. यासाठी मनोज जरांगे ठिकठिकाणी बैठका घेत आहेत.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला आरक्षण दिलं तर सरकारचं गुलाल लावून आभार मानणार. कुणीही आडवं आलं तरी आम्ही मुंबईला जाणारच. माझा जीव गेला तरीही मी मुंबईत जाणारच. आझाद मैदानात बसून आरक्षणाची लढाई लढणार आणि यावेळी ओबीसीतून आरक्षण घेऊन परत येणार असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले.

माणूस किती दलबदलू असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस

तर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, माणूस किती दलबदलू असाव याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. त्यांनी तसं वागू नये. त्यांना सत्तेवर ठेवायचं नसतं तर मराठ्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं का? त्यांच्या मनात काय आहे ते माहिती नाही पण आम्ही शांततेत मुंबईत जाणार आणि आरक्षण घेणार असं देखील यावेळी मनोज जरांगे म्हणाले.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ऑपरेशन सिंदूरमधील 9 अधिकाऱ्यांना मिळणार वीरचक्र 

तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पोलीस बघून घेतील. सत्ता असेत तर सगळं काही करता येईल या गैरसमजातून त्यांनी बाहेर यावं. तुम्ही एखाद्याला हात लावून दाखवा, मग सांगतो असा इशारा देखील माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube