Payal Malik: पायल मलिकने पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दलचे ‘ते’ गुपित उलघडलं; म्हणाली, ‘माझ्या जागी…
Payal Malik On Armaan Malik Second Marriage: दोन लग्ने करून तिघेही एकत्र राहण्यासाठी प्रसिद्ध असलेला अरमान मलिक (Armaan Malik) सध्या बिग बॉस ओटीटी 3 मध्ये ( Bigg Boss OTT 3) दिसत आहे. त्याने आपल्या दोन्ही पत्नी पायल (Payal Malik) आणि कृतिकासोबत घेत बिग बॉस घरात प्रवेश केला. मात्र, दुसऱ्या नॉमिनेशनमध्ये पायलला घराबाहेर फेकण्यात आले असून आता त्याची दुसरी पत्नी कृतिका अरमानसोबत हा गेम खेळत आहे.
View this post on Instagram
अरमानने बिग बॉसमध्ये प्रवेश केला तेव्हा शोच्या निर्मात्यांनी आणि अरमानवर बहुपत्नीत्वाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकने पहिल्यांदाच तिच्या पतीच्या दोन लग्नांबद्दल गुपित उघड केले आहे.
‘माझा वैयक्तिक अनुभव खूप वाईट’
अलीकडेच पायल मलिकने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव खूपच वाईट आहे. कारण माझ्या जागी दुसरे कोणी असते तर मी हे नाते अजिबात स्वीकारले नसते. मी स्वीकारण्याची अनेक कारणे आहेत. बरेच लोक म्हणतात की आम्ही दोन लग्नांना पाठिंबा देत आहोत, परंतु असे अजिबात नाही. आम्ही आमच्या व्लॉगमध्ये नेहमी म्हणतो की कोणीही दोन लग्न करू नये.
‘दुसऱ्या लग्नानंतर मी त्याला… ‘
आपले म्हणणे मांडताना पायल पुढे म्हणाली, ‘दुहेरी विवाह कुणालाही मान्य नाही, ना समाजाला, ना स्त्रीला. पण माझी परिस्थिती अशी होती, मी असे प्रसंग पाहिले आहेत की मला ते स्वीकारावे लागले. जेव्हा मला कळले की अरमानने दुसरं लग्न केलं आहे, तेव्हा मी त्याला सव्वा वर्षांनी सोडलं. मी आणि माझा मुलगा अरमानपासून वेगळे झालो होतो, पण परिस्थिती अशी होती की जे काही झाले ते विसरून एकत्र राहावे लागेल. म्हणूनच आज आम्ही एकत्र आहोत आणि खूप आनंदी आहोत.
Bigg Boss OTT 3:बिग बॉस ओटीटी काउंटडाउन सुरू, शो बाबत अभिनेत्याने दिली मोठी अपडेट
पायलला बाहेर काढल्यानंतर अरमान काय म्हणाला?
पायल मलिकच्या नावाची घोषणा होताच अरमान आणि कृतिका पायलला बाहेर सोडण्यासाठी गेले होते. कृतिकाने पायलला सांगितले होते, ‘मला माहिती आहे तू बाहेर आहेस, तू सांभाळशील. आम्ही पण येत आहोत. यावर पायल म्हणाली, ‘काही लवकर येऊ नकोस, शेवटपर्यंत खेळ.’ यानंतर पायल घराबाहेर गेली आणि कृतिका रडू लागली. यानंतर अरमान मलिक पायलचे सांत्वन करताना दिसला. अरमान म्हणाला, ‘मला तिने लढावे आणि ते करावे अशी माझी इच्छा होती, पण ती निघून गेली. मी आनंदी आहे’.