रोज 3-3 तास व्यायाम, न केल्यास शिक्षा; नोरा फतेहीसारख्या फिगरसाठी पत्नीचा छळ

Exercise for 3 hours daily, punishment if not; Wife tortured for a figure like Nora Fatehi in Gaziabad : सुंदर आणि कमनीय बांधा असणारी पत्नी हवी असण्याची अनेकांची आपेक्षा असते. पण त्यासाठी टोक गाठल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. एका सनकी पतीने नोरा फतेहीसारखी फिगर हवी म्हणून पत्नीला 3-3 तास व्यायाम करायला लावत होता. तसेच तेवढा व्यायाम नाही करू शकल्यास जेवण देण्यासही नकार देत होता. मात्र अखेर ही पत्नी पोलिसांमध्ये गेल्याने हा प्रकार समोर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मुरादनगरमधील एका महिलेचा विवाह मेरठमधील सरकारी शारिरीक शिक्षणाच्या शिक्षकाशी झालं होतं. पण लग्नानंतर त्याला पत्नीमध्ये काहीही रूची नव्हती. तसेच या महिलेचा बांधा सामान्य आहे. रंगही उजळ आहे. पण पतीने मला माझ्या शरीराच्या बांध्यावरून त्रास दिला. मला सुंदर दिसणारी पत्नी हवी होती. जिस शरीर नोरा फतेहीसारखं असेल मात्र आता माझं जीवन खराब झालं आहे.
त्यामुळे माझ्या पतीने मला नोरा सारखं सुडौल शरीर बनवण्याच्या सनकीपणामध्ये दररोज माझ्याकडून 3-3 तास व्यायाम करून घेत होता. एखाद्या दिवशी थकलेली असल्याने व्यायाम केला नाही तर तो जेवायला देत नसे. मला रोज ही जाणीव करून दिली जात होती की, माझा बांधा कमनिय नाही मी सुंदर दिसत नाही.
दरम्यान मी गर्भवती होते. त्यावेळी वाटले आता सगळं ठीक होईल. मी ही माहिती सासूला दिली. पण त्यांना आनंद झाला नव्हता. तर मला पतीने पोटदुखीच्या नावाखाली गर्भपाताची गोळी दिली. त्यानंतर माझी तब्बत बिघडली. तेव्हा रूग्णालयात गेले असता डॉक्टरांनी माझा गर्भपात झाल्याचं सांगितलं.
भारतात ऑनलाइन गेमिंगचा धमाका! 1100 कंपन्या, 60 कोटी गेमर्स आणि हजारो कोटींचा धंदा
दरम्यान या महिलेने असे देखील सांगितले की, लग्नामध्ये तिच्या वडिलांनी 75 लाख रूपये खर्च केले होते. नव्या कोऱ्या स्कॉर्पिओसह दागिने घरातील सर्व सुख-सुविधा देणाऱ्या वस्तू हुंड्यामध्ये दिल्या होत्या. तरी देखील आणखी पैशाची मागणी केली जात होती. त्यासाठी सासरच्या लोकांनी त्रास दिला.
Jiya Shankar : जिया धडक जाये, ‘वेड’फेम अभिनेत्रीचा मनमोहक लूक…
तसेच पती दुसऱ्या एका मुलीशी चॅटींग करत असल्याचा आरोप देखील या महिलेने केला. या सर्व प्रकाराला कंटाळून आता या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तर तपासानंतर या प्रकरणामध्ये पुढील कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती. धवल जायस्वाल आणि डीसीपी सिटीने दिली.