Download App

अन् शेलारांनी ‘त्या’ आठवणी सांगताच आशाताईंच्या डोळ्यात आलं टचकन पाणी

Asha Bhosale जीवनावरील पुस्तक 'स्वरस्वामिनी आशा' च्या प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलारांनी आठवणी सांगताच आशाताईंना अश्रू अनावर झाले.

Asha Bhosale emotional after Ashish Shelar speech : आशाताई (Aasha Bhosale) या महान गायिका नाहीतर महान नायिका देखील आहेत. मात्र त्यांच्या आयुष्यात अनेक खडतर वळणांसह मुलाचा मृत्यू आणि मुलीची आत्महत्या पाहण्याचा कमनशीबीपणा आला. अशी आठवण भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितली. ते आशा भोसले यांच्या जीवनावरील पुस्तक ‘स्वरस्वामिनी आशा’ च्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांचं भाषण ऐकुण आशाताईंना अश्रू अनावर (emotional) झाल्याचे पाहायला मिळालं.

अर्थसंकल्पात अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस; शेतकऱ्यांसाठी मोफत विजेसह ‘या’ केल्या घोषणा

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, आशाताई या महान गायिका नाहीतर महान नायिका देखील आहेत. कारण त्यांच्या आयुष्याचा कथानकच तसा आहे. जन्मापासून त्यांची पोटाची भूक होती मात्र तहान स्वरांची होती. कुटुंबातील गरिबी सोबत लहान पण काढता काढताच काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तर तारुण्य सुरू होताच प्रेम विवाह झाला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अजित पवारांकडून घोषणा; जुलैपासून लागू, वाचा सविस्तर

मात्र विभक्त झाल्याने मुलांची जबाबदारी एकटीने पार पाडावी लागली. हा संघर्ष संपत नाही तोच त्यांनी मुलाचा मृत्यू आणि मुलीचे आत्महत्या ही पाहिली. तरी देखील जगाला जिंकणारी संगीत साधना त्यांनी केली. अशा सर्व आठवणी सांगत आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्यासाठी सुरेश भट यांची गझल वाचून दाखवली. तर आशिष शेलार हे आशाताईंच्या जीवनातील या अविस्मरणीय आठवणी सांगत असताना आशा ताईंना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं.

दरम्यान ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणार मराठीतील पहिले पुस्तक स्वरस्वामिनी आशा याचा प्रकाशन सोहळा आज मुंबईमध्ये पार पडला. या पुस्तकामध्ये विविध गायक संगीतकार गीतकार साहित्यिक दिग्दर्शक लेखक आणि त्यांचे कुटुंबीय अशा 90 मान्यवरांनी आशाताईंबद्दल लिहिलेले 90 लेख आहेत.

follow us