Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थींच्या लग्नानंतर पहिल्या बायकोची पोस्ट; म्हणाल्या ‘आता सगळं संपलं’

Ashish Vidyarthi First Wife Piloo Vidyarthi Post : लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा दुसरे लग्न केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. एकीकडे नवा संसार थाटण्यासाठी आशिष सज्ज आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीने (Piloo Vidyarthi) सोशल मीडियावर […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 27T135020.193

Ashish Vidyarthi

Ashish Vidyarthi First Wife Piloo Vidyarthi Post : लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा दुसरे लग्न केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. एकीकडे नवा संसार थाटण्यासाठी आशिष सज्ज आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीने (Piloo Vidyarthi) सोशल मीडियावर (Social media) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.


सर्व काही संपलं असं म्हणत ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे या पोस्टमधून समजत आहे. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचे त्यांच्या पहिल्या बायकोला खूप वाईट वाटत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपलं दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले आहे,”तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे का? असा सवाल एक चांगला व्यक्ती तुम्हाला विचारणार नाही. तो असा सवाल तेव्हाच उपस्थित करणार आहे, जेव्हा त्याला माहित असेल की तो तुम्हाला त्रास देणार आहे. हे लक्षात ठेवा”.

पीलू विद्यार्थीने दुसऱ्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, एखाद्या गोष्टीचा खूप विचार केल्याने गोंधळून जायला होतं. आता सगळं संपलं आहे, असं वाटतं. पण आता आयुष्यात शांती येऊ दे. तुम्हालाही आशीर्वाद मिळावा कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात. राजोशीने देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे, की”चाकोरीबद्ध आयुष्य जगू नका”. सध्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे.

Kiran Mane Post: किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘तू पाटलीण…’

आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत. आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या बायकोचे नाव राजोशी बरुआ उर्फ पीलू विद्यार्थी आहे. पीलू या अभिनेत्री आणि गायिका आहेत. ‘इमली’ या छोट्या पडद्यावर त्यांनी आपली लोकप्रिय मालिकेत त्यांनी पहिले काम सुरु केले होते. पश्निम बंगालमध्ये जन्मलेल्या पीलू या बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची कन्या आहेत. त्यांच्या आईमुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली होती. 1993 मध्ये ‘टाइम्स एफएम’मध्ये रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2019 साली त्यांनी ‘सुहानी सी एक लडकी’ या सीरियलमध्ये काम केले होते. तसेच पीलू आणि आशिष यांच्या मुलांचं नाव अर्थ विद्यार्थी असं आहे.

Exit mobile version