रणवीर-अक्षय खन्नाची बॉक्स ऑफीसवर धुरंधर कामगिरी; सलग दुसऱ्या शुक्रवारी उच्चांकी कमाई
Dhurandhar चित्रपट रिलीज होऊन नऊ दिवस झाले आहेत. या नऊ दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
Ranveer-Akshaye Khanna’s Dhurandhar box office performance is impressive ; highest collection for the second consecutive Friday : रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा धुरंधर चित्रपट रिलीज होऊन नऊ दिवस झाले आहेत. या नऊ दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे हा चित्रपट 2025 चा सर्वात जास्त कमाई करणारा करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तीन नंबरला आला आहे. विशेष म्हणजे दक्षिणात्य चित्रपट ‘अखंडा 2‘ आणि ‘बॉलीवूडचा किस किस को प्यार करू‘ तो या दोन्ही चित्रपटांच्या स्पर्धेत धुरंदरने सुरुवातीलाच बाजी मारली आहे.
एस.एस. राजामौली यांच्याकडून ‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानींचे भरभरून कौतुक
दुसरीकडे मात्र धुरंदरच्या कामगिरीची कामगिरीचा परिणाम पन्नास वर्षेपूर्तीनिमित्त पुन्हा बॉक्स ऑफिसवर आलेल्या सर्वकालीन सुपरहिट चित्रपट शोलेला याचा फटका बसत आहे. तर धुरंधरच्या नऊ दिवसांच्या कमाईच्या आकडेवारी बद्दल सांगायचं झालं. तर गेल्या आठ दिवसात या चित्रपटाने भारतभरामध्ये तब्बल 252.70 कोटींची निव्वळ कमाई केली आहे. तर शुक्रवारी आठव्या दिवशी तब्बल 34.70 कोटी कमाई केली.
अक्षय खन्ना – राखेतून पुन्हा तेजाने उठणारा ‘धुरंधर’ कलाकार…
पदार्पण चमकदार, पण करिअरला लागला ब्रेक आणि मग नवी इनिंग बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांची कारकीर्द सुरुवातीपासूनच भरधाव राहते, तर काहींची गाडी एखाद्या टप्प्यावर येऊन अडखळते. अक्षय खन्ना हा दुसऱ्या प्रकारचा कलाकार—प्रतिभावान, लोकप्रिय, पण काही काळ पडद्यापासून दूर राहिलेला. पण, आज पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे, आणि त्याच्या नवीन ‘धुरंधर’ अवताराने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे…
‘धुरंधर’चा रहमान डकैत – लोकप्रियतेचं नवं शिखर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या भूमिकांपैकी एक ठरत आहे. त्याची बॉडी लँग्वेज, संवादफेक, नृत्य आणि पडद्यावरची उपस्थिती—या सगळ्याने प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या परफॉर्मन्सवर आधारित रील्स व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा त्याच्या ‘छावा’ मधील औरंगजेबची भूमिका आणि नॉस्टॅल्जिक होऊन प्रेक्षक त्याचा भरभरून कौतुक करत आहेत…
धुरंधरचा फटका सर्वकालीन सुपरहिट शोलेला
एकीकडे धुरंधर चित्रपट जबरदस्त कामगिरी करत आहे. दुसरीकडे मात्र या चित्रपटाच्या यशाचा काहीसा फटका शोले या चित्रपटाला बसत आहे. कारण शोले या एव्हरग्रीन चित्रपटाच्या पन्नास वर्षपूर्ती निमित्त हा चित्रपट निर्मात्याने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर रिलीज केला आहे. पण धुरंधरकडे वळणारा प्रेक्षक हा शोलेकडे काही प्रमाणात पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
