Ashok Saraf Award: ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (Sangeet Natak Akademi Award) जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर आता अभिनेत्याला संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने यांचा गौरव करण्यात येणार आहे. नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी 2023 वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. अशोक सराफ यांना नुकताच 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी: अशोक सराफ (अभिनय), विजय शामराव चव्हाण, (ढोलकीवादक), कलापिनी कोमकली (हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत), नंदिनी परब गुजर (सुगम संगीत), सिद्धी उपाध्ये (अभिनय), महेश सातारकर (लोकनृत्य), प्रमिला सूर्यवंशी (लावणी), अनुजा झोकरकर ( हिंदुस्तानी शास्त्रीय गायक), सारंग कुलकर्णी ( सरोद वादक ), नागेश आडगावकर (अभंग संगीत), ऋतुजा बागवे (अभिनय), प्रियांका शक्ती ठाकूर (पारंपारिक कला).
Rutuja Bagwe: मराठमोळ्या ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर
संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेमार्फत प्रधान करण्यात येणारा पुरस्कार आहे. यामध्ये अनेक विविध कलाक्षेत्रामधील कलावंतांना देण्यात येणारा महत्वाचा पुरस्कार आहे. यामध्ये कलाक्षेत्रामधील योगदानांबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात. संगीत नाटक अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.