‘Avadhoot Gupteच्या घरात माकडाचा धुमाकूळ; व्हिडीओ शेअर करत म्हणाला,“माकड चेष्टा” खुपते!

Avadhoot Gupte : लोकप्रिय गायक आणि सध्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामुळे जोरदार चर्चेत येत असलेले अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. अवधूतच्या घरामध्ये माकडाने चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ शेअर करत असताना त्याने एक […]

Avadhoot Gupte

Avadhoot Gupte

Avadhoot Gupte : लोकप्रिय गायक आणि सध्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामुळे जोरदार चर्चेत येत असलेले अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. अवधूतच्या घरामध्ये माकडाने चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ शेअर करत असताना त्याने एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.


अवधूतने घरात माकड फिरत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. तसेच त्याने ‘तुम्हाला काय खुपते.. तर सध्या आम्हाला रोज सकाळी उठून पाहायला मिळणारी एक माकड (Monkey Video) चेष्टा खुपते?’ अशी मिस्कील पोस्ट त्यांनी यावेळी लिहली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत माकड घरात इकडून तिकडे फिरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच माकडाने घरातील केळी घेत तिथेच खायला सुरूवात केल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच अशी पोस्ट अवधूत गुप्तेंनी यावेळी केली आहे.

नेहरूंची ऑफर स्विकारली असती तर Oppenheimer भारतीय असते, वाचा किस्सा…

Exit mobile version