Ayushmann Khurrana : बॉलिवूड सुपरस्टार अयुष्मान खुराना विमेन्स प्रीमियर लीग 2025 (WPL) च्या उद्घाटन सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्ससाठी सज्ज झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यात परफॉर्म करणारा तो एकमेव सेलिब्रिटी असेल. WPL ची सुरुवात गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील पहिल्या सामन्याने होईल, जो शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.
एका सूत्राने सांगितले, “संपूर्ण जगभरातील आणि वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियममधील प्रेक्षक अयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) अविस्मरणीय परफॉर्मन्ससाठी उत्सुक आहेत!” अयुष्मानचा खास गाणं आणि डान्स परफॉर्मन्स उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवेल आणि WPL ची सुरूवात जोरदार होईल. ही क्रिकेट स्पर्धा आता जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडवत आहे.”
आयुष्मान खुराना सूरज बडजात्याच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना प्रेमच्या भूमिकेत दिसणार आहे. सूरज बडजात्याचा हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे टायटल अद्याप निश्चित झालेले नाही. म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल किंवा मे मध्ये सुरू होईल. सूरज बडजात्या यांनी काही उत्तम पारंपारिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
गौतम अदानींना पुन्हा धक्का, चक्क 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून कंपनीची माघार, ‘हे’ आहे कारण
सूरज बडजात्याच्या चित्रपटाव्यतिरिक्त, आयुष्मान खुरानाच्या हातात ‘थामा’ देखील आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदान्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकारही दिसणार आहेत. ‘मुंज्या’ फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिनेश विजन अमर कौशिकसोबत ‘थामा’ची निर्मिती करणार आहेत. त्याच वेळी, आणखी एका चित्रपटात, आयुष्मान सारा अली खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.